मुंबई : कॉमेडियन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. भारती आणि हर्ष हे आता आई-वडिलांची जबादारी निभावताना दिसणार आहेत. हर्ष लिंबाचियाने सोशल मीडियावर आपल्‍या चात्‍यांसोबत मुलाच्‍या जन्माची बातमी शेअर केली अहे. भारतीने 2021 च्या मध्यात आपण आई होणार असल्याची बातमी दिली होती.

दरम्यान, हर्ष लिंबाचियाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये भारती सिंग आणि हर्ष दोघेही पंड्या रंगाच्या मॅचिंग आउटफिट्समध्ये दिसत आहेत. हर्ष लिंबाचियाने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले, ‘इट्स अ बॉय’ हर्षने ही बातमी शेअर करताच सर्व सेलिब्रटी तसेच चाहते त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

भारती सिंगने डिसेंबर 2021 च्या मध्यात सोशल मीडियार तिच्‍या गरोदरपणची बातमी शेअर केली होती. भारतीने एक मजेशीर व्हिडीओ शेअर करत याची माहिती दिली होती. भारती आणि हर्ष 3 डिसेंबर 2017 रोजी लग्नबंधनात अडकले.