सध्या उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येकजण डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबेरंगी गॉगल-चष्मे खरेदी करताना दिसतात.

उन्हाची तीव्रता वाढु लागल्याने डोळयांना खुप त्रास होतो. त्यामुळे डोळ्यांना गारवा देण्यासाठी लोकं गॉगल वापरतात. मात्र,लोक चांगल्या कंपनीच्या दर्जेदार गॉगलची किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी नसल्याने,कमी किंमतीत मिळणारे रस्त्यावरील गॉगल वापरण्याकडे अनेकांचा कल दिसून येतो.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार रस्तावर,फेरीवाल्यांकडून १००-१५० रुपयांत खरेदी केलेले गॉगल निकृष्ट दर्जाचे असल्याने डोळ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार व त्रास सुरू होतात. त्यामुळे आपण गॉगल वापरताना चांगला पध्दतीचे व उत्कृष्ट दर्जाचेच गॉगल वापरावेत.

कोणताही चष्मा/गॉगल घेताना घ्या ही काळजी तर केवळ रस्त्यावरीलच नाही, तर दुकानातील गॉगल घेतानाही काळजी घेण्याची गरज असते. गॉगल समोर धरल्यास पलीकडील दृश्य स्पष्ट दिसायला हवी. जर ते दृश्य अस्पष्ट आणि चित्र-विचित्र दिसत असेल तर तो गॉगल निकृष्ट दर्जाचा समजावा. नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट गॉगल विकले जातात. या स्वस्तातील गॉगलमुळे डोळेदुखी, डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

डोळ्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे कमी किमतीच्या गॉगलमध्ये प्लास्टिक व त्यावरचा रंगही निकृष्ट दर्जाचा असतो. अशा गॉगलमध्ये अल्ट्राव्हॉयलेट किरणांपासून संरक्षण देणारी सुविधा नसते. त्यामुळे डोळ्यांच्या बुबुळांना इजा होतात . यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते.