Multibagger Stock
Multibagger Stock

गेल्या एका वर्षात अनेक पेनी स्टॉक (Penny stock) मल्टीबॅगर्स असल्याचे सिद्ध झाले आहे. वर्षभरापूर्वी यातील अनेक शेअर्सची किंमत एक रुपयापेक्षाही कमी होती. MIC Electronics हा असाच स्टॉक आहे. या स्टॉकने गेल्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. गेल्या वर्षी या शेअरची किंमतही एक रुपयाच्या खाली होती मात्र एका वर्षात ती 21 रुपयांच्या पुढे गेली आहे. अशा प्रकारे या स्टॉकने गुंतवणूकदारांना मोठा नफा दिला आहे.

एका वर्षात 2,250 टक्के परतावा –
19 मार्च 2021 रोजी एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स (MIC Electronics) च्या शेअरची किंमत 90 पैसे होती. 21 मार्च 2022 रोजी शेअर बाजार बंद झाला तेव्हा कंपनीच्या शेअरची किंमत BSE वर 21.15 रुपये होती.

अशाप्रकारे गेल्या एका वर्षात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 2,250 टक्के इतका जबरदस्त परतावा दिला आहे. दुसरीकडे या काळात सेन्सेक्स (Sensex) मध्ये 15 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली.

एक लाखाचे झाले 23.50 लाख –
जर एखाद्याने वर्षभरापूर्वी MIC Electronics च्या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील आणि ते शेअर्स आत्तापर्यंत ठेवले असतील, तर त्या गुंतवणुकीचे मूल्य 23.50 लाख रुपये झाले असते. याचा अर्थ गुंतवणूकदार सध्या 22.50 लाख रुपयांच्या नफ्यात आहे.

या सरासरीच्या वर स्टॉक जात आहे –
हा मायक्रोकॅप स्टॉक (Microcap stocks) त्याच्या 5 दिवस, 20 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरीपेक्षा जास्त आहे. परंतु हा स्टॉक 50 दिवसांच्या मूव्हिंग सरासरीपेक्षा कमी आहे.

त्रैमासिक निकालांबद्दल जाणून घ्या –
चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 7.14 कोटी रुपये होता, जो वार्षिक तुलनेत 420 टक्क्यांनी वाढला आहे. यापूर्वी 2020 च्या ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत कंपनीला 2.23 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

कंपनीच्या व्यवसायाबद्दल जाणून घ्या –
MIC Electronics Limited ही विद्युत प्रकाश उपकरणे तयार करणारी एक भारतीय कंपनी (Indian company) आहे. हि कंपनी एलईडी डिस्प्ले (LED display) आणि एलईडी दिवे तयार करते. कंपनी इनडोअर डिस्प्ले, आउटडोअर डिस्प्ले, मोबाइल डिस्प्ले आणि अॅप्लिकेशन-विशिष्ट डिस्प्ले बनवते. कंपनी इनडोअर लाइटिंग, सोलर लाइटिंग, आउटडोअर लाइटिंग आणि पोर्टेबल्ससह विविध श्रेणीतील एलईडी दिवे तयार करते.