मुंबई : सध्या इंडस्ट्रीत अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. येत्या 17 एप्रिलला हे जोडपं लग्न करणार असल्याची माहिती मिळत आहे. यावर भट्ट किंव्हा कपूर कुटुंबाकडून अधिकृत माहिती देण्यात आली नसली तरी अनेक कलाकार आता या लग्नावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. यातच आता बॉलीवूडचा खलनायक अभिनेता संजय दत्त यानेही या लग्नावर प्रतिक्रिया देत. या जोडप्याला खास आशीर्वाद दिला आहे.

नुकत्याच एका कार्यक्रमात संजयला जेव्हा आलीया आणि रणबीरच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याला धक्काच बसला होता आणि तो म्हणाला, ‘दोघांचे लग्न होणार आहे का? कारण तो तसे करत असेल तर मला खूप आनंद होईल. लग्न ही एकमेकांशी केलेली बांधिलकी आहे आणि त्यांना ते टिकवून राहावे लागेल. तुम्हाला हे नातं धरून ठेवावे लागेल. या प्रवासात सुख-शांती घेऊन पुढे जावे लागते. हे सर्व खरे असेल तर रणबीरला लवकर बाळ हो आणि दोघे कायम आनंदी राहा.’ असं म्हणत संजय दत्तने आलीया आणि रणबीरला आशिर्वाद दिला आहे. संजयचे हे वक्तव्य सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दरम्यान, आलिया आणि रणबीर हे अगदी साध्या पद्धतीने लग्न करणार आहेत. ज्यामध्ये फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे लोक लग्नाला उपस्थित राहणार आहेत आणि या लग्नात फक्त एक किंवा दोन फंक्शन असतील. ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांनी 20 जानेवारी 1980 रोजी आरके हाऊसमध्ये सात फेऱ्या मारल्या आणि आई-वडिलांप्रमाणेच रणबीर कपूरही चेंबूरमधील कपूर कुटुंबाचे वडिलोपार्जित घर असलेल्या आरके हाऊसमध्ये सात फेऱ्या मारणार आहे.