मुबई : रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा नवा कर्णधार फाफ डू प्लेसिसने IPL 2022 (IPL) सुरू होण्यापूर्वी आपल्या संघातील खेळाडूंना एक विशेष कॅप दिली आहे. या कॅपवरती खेळाडूचा डेब्यू नंबर आहे.
बंगळुरू फ्रँचायझीने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून या विशेष कार्यक्रमाची माहिती दिली. फाफ डू प्लेसिस विराट कोहली आणि दिनेश कार्तिकला कॅप देतानाच फोटो दिसत आहेत. या फोटोंसह आरसीबीने कॅप्शनमध्ये लिहिले, “आरसीबीकडून खेळणारा कोणताही खेळाडू या फ्रँचायझीच्या इतिहासाचा भाग बनतो. या नवीन परिचयाचा भाग म्हणून, IPL 2022 पासून, आमचे खेळाडू आंतरराष्ट्रीय संघांप्रमाणे, कालक्रमानुसार, पदार्पण क्रमांकासह कॅप घालतील. कर्णधार फाफ डू प्लेसिसने आज विराट कोहली, कर्ण शर्मा, एस श्रीराम, हर्षल पटेल, दिनेश कार्तिक, मोहम्मद सिराज, कुलवंत खेजरोलिया आणि शाहबाज अहमद यांना कॅप्स दिल्या.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलच्या आगामी हंगामासाठी फाफ डू प्लेसिसची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. डू प्लेसिस हा यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग होता पण या मोसमापासून तो आरसीबीचे नेतृत्व करताना दिसणार आहे. आयपीएलच्या या मोसमात त्याच्या नेतृत्वाखाली प्रथमच जेतेपद पटकावण्याची आशा संघाला असेल. आरसीबीला एकदाही आयपीएलचे विजेतेपद मिळालेले नाही. संघ अंतिम फेरीत नक्कीच पोहोचला असला तरी विजेतेपद मिळवू शकलेला नाही. मात्र, यावेळी तो विजेतेपदासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू इच्छितो.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या मोसमात आपला पहिला सामना पंजाब किंग्जसोबत खेळणार आहे. आरसीबीने लिलावापूर्वी विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज यांना कायम ठेवले होते. यानंतर त्यांनी लिलावात अनेक दिग्गज खेळाडूंची निवड केली.