मुंबई : शाहरुख खानची मुलगी सुहाना खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सुहाना आणखी कोणत्या चित्रपटात झळकली नसली तरी तिचे लाखो चाहते पाहायला मिळतात. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. दरम्यान, नुकतंच सुहाणाने एक बोल्ड फोटोशूट केले आहे. या फोटोंनी सोशल मीडियावर आग लावली आहे.

सुहाना खानने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये ती ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे, जो बॅकलेस आहे. या आउटफिटमध्ये तिने बाली स्टाईल कानातले, मेकअप आणि केसांचा बन बनवून तिचा लूक पूर्ण केला. सुहानाचा हा फोटो आता चाहत्यांमध्ये चर्चेत आला आहे.

दरम्यान, सुहाना खान लवकरच झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करताना दिसणार आहे. या चित्रपटात सुहाना खानसोबत अमिताभ बच्चन यांची नात अगस्त्य नंदा आणि श्रीदेवी-बोनी कपूर यांची धाकटी मुलगी खुशी कपूर देखील दिसणार आहे. तिन्ही स्टार किड्सचा हा डेब्यू चित्रपट आहे, त्यामुळे तिघांचेही चाहते खूप उत्सुक आहेत.