Beauty tips : (Beauty Tips) केसाच्या समस्येसाठी आपण अनेक उपाय करत असतो. मात्र तुरटीचा वापर केसांसाठी खूप फायद्याचा राहतो. खोबऱ्याच्या तेलामध्ये तुरटी (Alum) मिसळून लावल्यास केसगळती (Hair Care) पासून ते कोंड्याची समस्या दूर होऊ शकते. जाणून घ्या तुरटीचे हे फायदे.

खोबरेल तेलासह तुरटीचा वापर केल्याने केसांच्या किरकोळ समस्याही दूर होतात. जर वेळेआधीच तुमच्या त्वचेवर वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागली असतील, मृत त्वचा त्वचेचा रंग कमी करत असेल, तर तुरटी वापरा, या समस्यांपासून सुटका मिळेल.

तुरटी आणि खोबरेल तेल अशा प्रकारे वापरा

1. सर्व प्रथम, खोबरेल तेल गरम करा. यानंतर त्यात तुरटी पावडर मिसळा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर राहू द्या. 30 मिनिटांनी चेहरा स्वच्छ करा.

जर तुम्हाला मृत त्वचा काढायची असेल तर चेहरा धुण्यापूर्वी हलक्या हातांनी मसाज करा. जेणेकरून मृत त्वचा निघून जाईल. हात आणि पायांना टॅनिंग होत असतानाही तुम्ही मृत त्वचा काढण्यासाठी हे मिश्रण वापरू शकता.

2. केसांसाठी खोबरेल तेलात तुरटी पावडर टाळूला लावा. 30 मिनिटांनी शॅम्पू करा. हे मिश्रण तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावा. काही दिवसात तुम्हाला फरक स्पष्ट दिसेल.

3 असे करा आणि 1 तासानंतर धुवा. यामुळे केस गळणे थांबते आणि नवीन केस वाढू लागतात.

4. आजकाल, बहुतेक लोकांना वयानुसार चेहऱ्यावर फ्रिकल्स किंवा हायपरपिग्मेंटेशन होऊ लागतात. तुम्हीही यापैकी असाल तर खोबरेल तेलात तुरटी मिसळून वापरा. चेहऱ्यावर लावा. यामुळे तुमच्या त्वचेला (Skin) मॉइश्चरायझर मिळते आणि पिगमेंटेशनपासूनही सुटका मिळते.