Maharashtralive24.com
Maharashtra Breaking News Updates

Khan Sir YouTube Income : बापरे ! YouTube वर प्रसिद्ध असणारे खान सर किती पैसे कमवतात? पाहून डोळे फिरतील

आज युट्युब आणि सोशल मीडियाच्या मदतीने अनेक जण महिन्याला हजारो लाखो रुपये कमवत आहेत. पण या यूट्यूबर्स आणि सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर्सच्या प्रत्यक्ष कमाईबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे.

0

Khan Sir YouTube Income : भारतात इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे सोशल मीडियावर कंटेंट तयार करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

आज युट्युब आणि सोशल मीडियाच्या मदतीने अनेक जण महिन्याला हजारो लाखो रुपये कमवत आहेत. पण या यूट्यूबर्स आणि सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर्सच्या प्रत्यक्ष कमाईबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे.

पण आज आम्ही तुम्हाला युट्युबवरील प्रसिद्ध असणारे खान सरांची कमाई किती आहे? युट्यूबच्या मदतीने खान सर किती पैसे कमावतात याबद्दल सांगणार आहोत. ते एक प्रसिद्ध शिक्षक आहेत. खान सरांचे विद्यार्थी सांगतात की, त्यांची शिकवण्याची पद्धत सर्वांपेक्षा वेगळी आहे. चला तर मग आता युट्युबवर खान सर किती कमाई करतात ते जाणून घेऊया. त्यांची इतर माहितीही पाहूया.

* खान सर नेमके कोण आहेत ?

खान सर हे भारतातील प्रसिद्ध शिक्षक आणि YouTuber आहेत, त्यांचे खरे नाव फैजल खान आहे. त्यांचा जन्म डिसेंबर १९९३ मध्ये भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील एका छोट्या गावात झाला. खान सर एका गरीब कुटुंबात वाढले, त्यामुळे सुरुवातीचा काळ त्यांच्यासाठी फारसा चांगला नव्हता. पण तरीही मेहनतीने त्यांनी शिक्षण पूर्ण करून विज्ञान आणि भूगोल विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली. खान सर स्पर्धा परीक्षा देऊ शकले नाहीत कारण त्यांकडे पैशांची कमतरता होती.

* अशा प्रकारे झाले प्रसिद्ध

पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या आणि नंतर २०१९ मध्ये त्यांनी पाटण्यात खान जीएस रिसर्च सेंटर नावाची स्वत:ची कोचिंग इन्स्टिट्यूट सुरू केली. युट्यूबवरील खान सरांचे शैक्षणिक व्हिडिओ सगळ्यांना आवडले आणि येथूनच त्यांच्या फेमस होण्यास सुरुवात झाली. आज खान सरांच्या युट्यूब चॅनेलचे २१ मिलियनहुन अधिक Subscribers आहेत.

* ₹107 कोटींची ऑफर नाकारली

जेव्हा लोकांना यूट्यूबवर खान सरांचे व्हिडिओ आवडू लागले, तेव्हा त्यांना अनेक मोठ्या कंपन्यांकडून ऑफर येऊ लागल्या की सर, तुम्ही आमच्या कंपनीसाठी शिकवा, आम्ही तुम्हाला पैसे देऊ. पण खान सरांचे सुरुवातीपासूनच ध्येय होते की शिक्षण इतके स्वस्त करावे की कोणतेही मूल त्याचा अभ्यास सहज पूर्ण करू शकेल, म्हणूनच खान सरांच्या कोचिंग इन्स्टिट्यूटमधील मुलांसाठी अभ्यासक्रमाची फी फक्त 200 रुपये आहे. तसेच खान सरांना एका खूप मोठ्या शैक्षणिक कंपनीकडून 107 कोटी रुपयांची ऑफर आली होती, जी खान सरांनी मुलांच्या फीमुळे नाकारली होती.

* खान सरांचे YouTube वरून मिळणारे उत्पन्न

खान सरांच्या कोचिंग इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमाची फी केवळ 200 रुपये आहे. त्यांच्या यूट्यूब चॅनेलबद्दल बोलायचे झाले तर खान सर युट्युबवर शैक्षणिक व्हिडिओ अपलोड करतात ज्यामध्ये ते इतिहास, भूगोल आणि चालू घडामोडींचे व्हिडिओ बनवतात. सध्या युट्यूबवर खान सरांचे २१ मिलियनहुन अधिक Subscribers आहेत. रिपोर्ट्सनुसार, खान सर आपल्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून दरमहा 10 ते 15 लाख रुपये कमवतात, जे ते यूट्यूब जाहिरातींच्या मदतीने कमावतात. आज खान सर संपूर्ण भारतात उत्तम शिक्षक म्हणून ओळखले जातात, परंतु हे सगळे घडले कारण खान सरांचा नेहमीच स्वतःवर विश्वास होता आणि त्यांनी नेहमीच आपली मेहनत चालू ठेवली. त्याचेच त्यांना फळ मिळाले आहे.