मुंबई : बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांनी भारतात डिस्को म्युझिकचा पाया घातला. बप्पी लहरी यांचे १५ फेब्रुवारी २०२२ रोजी निधन झाले. नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत बप्पी लहिरी यांच्या मुलागा बप्पा लहरी यांनी आपल्या वडिलांवर बायोपिक बनवणार असल्याचे सांगितले. तसेच, जेव्हाही माझ्या आयुष्यावर बायोपिक बनवला जाईल तेव्हा रणवीर सिंगने त्याची भूमिका साकारावी, असं बप्पी लहरीची इच्छा असल्याचं सांगितलं.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना बप्पा लहरी म्हणाले,”माझ्या नेहमीच इच्छा होती की रणवीर सिंगने त्याच्या बायोपिकमध्ये काम करावे. माझ्या वडिलांचे रणवीर सिंगवर खूप प्रेम होते. त्यामुळे रणवीर सिंगने त्याच्या बायोपिकमध्ये त्याची भूमिका साकारावी, अशी त्याची इच्छा होती.” मात्र, बप्पा यांना बप्पी लहरी यांच्या बायोपिकच्या अपडेटबद्दल विचारले असता, अजून 3 ते 4 वर्षांपूर्वीचा कालावधी असल्याचं त्यांनी सांगितलं.

बप्पा लहरी पुढे म्हणाले की, “आम्ही रणवीर सिंगशी याविषयी कधीही बोललो नाही. त्याच्याशी बोलण्याआधी लेखन आणि प्री-प्रॉडक्शनचे काम पूर्ण करावे लागेल. आम्हाला अनेक ऑफर देखील मिळाल्या आहेत. परंतु तरीही आम्ही योग्य गोष्टी शोधत आहोत. या बायोपिकबद्दल रणवीरशी बोलण्यासाठी आम्ही अजून त्या स्टेजवर नाही आहोत. रणवीर सिंगमध्ये माझ्या वडिलांचे सर्व गुण आहेत आणि त्याला संगीताची जाण आहे. ते माझ्या वडिलांचे खूप मोठे चाहते आहेत आणि त्यांचा आदर करतात.”