State Bank of India
State Bank of India

उद्या तुम्ही बँकेत गेल्यावर तुमचे कोणतेच होणार नाही? एटीएममध्ये पोहोचल्यावर तेथे नो कॅश लिहिलेले आढळल्यास आश्चर्य वाटू नका. कारण 28 आणि 29 मार्च रोजी बँक (Bank) कर्मचारी संपावर जाणार आहेत. ज्याचा परिणाम कामावर होणार हे नक्की.

खरे तर बँकांच्या खाजगीकरणाला विरोध होत असून, याच पर्वात बँक संघटनांनी 28 आणि 29 मार्चला दोन दिवसांचा संप जाहीर केला आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही काही कामासाठी सोमवार आणि मंगळवारी बँकेत पोहोचलात तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. कारण बँकांमधील संपामुळे कामकाज बंद राहणार आहे.

कामावर परिणाम होईल –
देशातील सर्वात मोठी स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) ने स्वतः सांगितले की, संपाचा परिणाम कामकाजावर होणार आहे. या संपात सर्व बँकांचे कर्मचारी सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच एटीएम (ATM) सेवेवरही परिणाम होऊ शकतो.

तसेच या कालावधीत ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू नये, यासाठी आमच्याकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे एसबीआयने निवेदन जारी केले आहे.तसेच बँकांच्या खाजगीकरणाच्या निषेधार्थ हा संप करण्यात येत आहे.

सलग 4 दिवस बँकेतील सेवा राहणार बंद –
26 मार्चला चौथा शनिवार आणि 27 मार्चला रविवार असल्याने बँकांना सुट्टी आहे. अशा प्रकारे सलग 4 दिवस बँका बंद राहतील. त्यामुळे कामात व्यत्यय येणं स्वाभाविक आहे. मात्र या काळात नेटबँकिंग (Netbanking)आणि एटीएम सेवा उपलब्ध असेल.

मात्र बँक सतत बंद राहिल्याने एटीएममध्येही रोकड तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकार (Central Government) ने IDBI बँकेसह दोन बँकांचे खाजगीकरण (Privatization) करण्याची घोषणा केली आहे.

सरकारने गेल्या अर्थसंकल्पातच ही घोषणा केल्यापासून बँक संघटना खासगीकरणाला विरोध करत आहेत. सरकारने बँकांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मागे घ्यावा, अशी मागणी संघटना करत आहेत. याशिवाय इतरही अनेक मागण्या आहेत.