मुंबई : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन लवकरच आगामी ‘शेहजादा’ चित्रपटात दिसणार आहे. तो सध्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मॉरिशसला रवाना झाला आहे. यादरम्यान कार्तिकचे सेटवरील काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये कार्तिक खूपच दमदार अवतारात दिसत आहे.

सेटवरील हे फोटो कार्तिकच्या एका फॅन पेजने शेअर केले आहे. ज्यामध्ये तुम्हाला कार्तिक आर्यन त्याच्या ‘शेहजादा’ चित्रपटातील लूकमध्ये पाहायला मिळेल. काही काळातच हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. या फोटोवरून असे दिसते की कार्तिक आर्यन शूटिंगसाठी जात होता जेव्हा त्याचे हे फोटो काढले गेले आहेत.

या फोटोत कार्तिक आर्यन पांढरा टी-शर्ट, काळी ट्रॅक पॅन्ट आणि बूटमध्ये दिसत आहे. कार्तिक आर्यनने हातात ऑलिव्ह ग्रीन शर्ट घेतला आहे, यासोबतच त्याने सेफ्टी गियर देखील घातले आहे आणि त्याचा एकूण लुक अप्रतिम दिसत आहे. कार्तिक आर्यनसोबत त्याची टीमही दिसत आहे. हे फोटो पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्साह वाढला आहे. अनेकांनी फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत कार्तिकवरील आपले प्रेम दाखवले आहे.