ipl
Bad news for fans; IPL matches without spectators this year too!

मुंबई : IPL 2022 पूर्वी चाहत्यांना मोठा झटका बसू शकतो. इंडियन प्रीमियर लीगचा 15वा सीझन पुन्हा विनाप्रेक्षक आयोजित केला जाऊ शकतो. आयपीएल सुरु होण्यापूर्वी ५० टक्के पप्रेक्षकांना परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता या सर्व परवानग्या येत्या 7 दिवसांत मागे घेण्यात येतील.

राज्यात पुन्हा एकदा कोविड-19 चा धोका दिसत आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला इशारा दिला आहे. IPL चा पहिला सामना 26 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात होणार आहे.

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ANI ला सांगितले, “आम्हाला केंद्र सरकारकडून सतर्क राहण्याचे पत्र मिळाले आहे कारण युरोपीय देश, दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये पुन्हा एकदा कोविड -19चा धोका वाढला आहे. यामुळे आरोग्य विभागाने आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलला पत्र जारी करून सतर्क राहून आवश्यक पावले उचलण्यास सांगितले होते. आम्ही सध्या आयपीएल सामन्यांवर टिप्पणी करू इच्छित नाही.”

महाराष्ट्राने आयपीएल 2022 चे आयोजन पूर्णपणे बायो-बबलमध्ये करण्याची तयारी केली आहे. ज्यामध्ये मुंबई आणि पुणे येथे लीग टप्प्यातील 70 सामने होणार आहेत. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल आणि महाराष्ट्र सरकारने आयपीएल सामन्यांसाठी 50% प्रेक्षकांना परवानगी देण्याची योजना आखली होती. गेल्या काही आठवड्यांपासून कोविड-19 प्रकरणांमध्ये घट झाल्यामुळे स्पर्धेच्या तिकिटांची विक्रीही सुरू झाली होती.

आयपीएल 2022, स्पर्धेच्या पहिल्या सामन्याला फक्त एक आठवडा उरला असला तरी, COVID-19 प्रकरणांमध्ये वाढ त्या योजनांमध्ये मोठा अडथळा आणू शकते. एएनआयच्या वृत्तानुसार, युरोपीय देश, दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णांबाबत केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला सतर्क केले आहे.