मुंबई : स्वरा भास्कर सध्या लॉस एंजेलिसमध्ये आहे. तिने सोशल मीडियावर अनेक फोटोही शेअर केले आहेत. पण, यादरम्यान स्वरा भास्करसोबत एक विचित्र घटना घडली. जी अभिनेत्रीने सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे.
याठिकाणी राहत असताना स्वरा भास्करने काही मत्त्वाच्या वस्तू खरेदी केल्या होत्या पण तिचा कॅब ड्रायव्हर सर्व सामान घेऊन निघून गेला. अभिनेत्रीने बुधवारी ट्विट करून या घटनेची माहिती दिली. तिने उबर कॅबला ट्विट करून या घटनेची माहिती दिली.
तिने ट्विटरवर लिहिले, ‘@Uber_Support, लॉस एंजेलिसमधील तुमचा एक ड्रायव्हर माझ्या महत्वाच्या वस्तू घेऊन पळून गेला. मी तिथे उपस्थित असताना देखील त्याने हे कृत्य केलं. तुमच्या अॅपवर याची तक्रार करण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही. तुमचा एक ड्रायव्हर माझ्या सर्व वस्तू घेऊन निघून गेला. मला माझे सामान परत मिळेल का? यासोबतच तिने पर्यटकांच्या समस्याही लिहिल्या आहेत.
स्वरा भास्करच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती ‘जहां चार यार’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात शबाना आझमी आणि दिव्या दत्ता देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन फराज आरिफ अन्सारी यांनी केले आहे. एका प्रेमकथेवर आधारित हा चित्रपट आहे. अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्याचे स्क्रीनिंगही झाले असून या चित्रपटाचे खूप कौतुकही झाले आहे. अभिनेत्रीने ‘जहां चार यार’ चित्रपटाचे शूटिंगही पूर्ण केले आहे.