मुंबई : 19 वर्षाखालील विश्वचषकातील स्टार फलंदाज डेवाल्ड ब्रेविसने बुधवारी (6 एप्रिल) KKR विरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण करताच आपल्या क्षमतेचा पुरावा दिला आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघ नाणेफेक हारल्यानंतर चांगली सुरुवात करण्यात अपयशी ठरला, मात्र असे असतानाही या युवा फलंदाजाने धैर्याने फलंदाजी केली. ब्रेविसने आपल्या छोट्या डावात अप्रतिम शॉट्स खेळून सर्वांना चकित केले. दरम्यान, ब्रेविसचा नो लूक सिक्स देखील यावेळी पाहायला मिळाला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव आणि बेबी एबी म्हणजेच डेवाल्ड ब्रेविस यांचा KKR विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला.
अंडर 19 विश्वचषकादरम्यान डेवाल्ड ब्रेविसची फलंदाजी पाहिलेल्या कोणालाही माहित आहे की त्याला बेबी एबी असे का म्हटले जाते. खरं तर, महान फलंदाज एबी डिव्हिलियर्ससारख्या या युवा फलंदाजाकडे असे अनेक शॉट्स आहेत आणि जेव्हा हा खेळाडू मैदानावर फलंदाजी करतो तेव्हा सर्वांना एबी डिव्हिलियर्सची आठवण येते. केकेआरविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातही असेच घडले.
NO LOOK SMACK pic.twitter.com/d5uq4g0vyL
— ✖️ (@_klausxx) April 6, 2022
बेबी एबीने आपल्या फलंदाजीदरम्यान 19 चेंडूंचा सामना करताना दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 29 धावा केल्या. दरम्यान, ब्रेविसने आश्चर्यकारक नो लुक सिक्सही मारला. हाच व्हिडिओ सध्या चाहत्यांमध्ये व्हायरल होत आहे. यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या या युवा फलंदाजाची खेळी पाहून सर्व चाहत्यांना एबी डिव्हिलियर्सची आठवण नक्कीच झाली.