मुंबई : ‘बाहुबली’ फेम बल्लालदेव म्हणजेच अभिनेता राणा दग्गुबाती काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आला आहे. लवकरच तो बाबा होणार असल्याच्या चर्चा होत आहेत. ज्यावर आता राणाची पत्नी मिहिका बजाजनं मौन सोडत आपली या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच मिहिकानं तिच्या इन्स्टाग्रामवर पती राणा डग्गुबतीसोबत एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये मिहिकाचं वाढलेलं वजन पाहून अनेकांनी ती प्रेग्नन्ट असल्याचं म्हटलं होतं. यावर आता मिहिकानं प्रतिक्रिया दिली आहे. मिहिकाच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट करत तिच्या प्रेग्नन्सीबद्दल विचारणा केली होती. यावर उत्तर देताना मिहिकानं प्रेग्नन्सीचं सत्य उघड केलं आहे.

एका युजरच्या प्रश्नाचं उत्तर देताना ती म्हणाली, ‘नाही मी प्रेग्नन्ट नाहीये. फक्त लग्नानंतर माझं वजन काहीसं वाढलं आहे.’ मिहिकाच्या या उत्तरावरून समजून येतं की या दोघांनीही अद्याप कोणतंही फॅमिली प्लानिंग केलेलं नाही. दरम्यान, राणा डग्गुबती आणि मिहिका बजाज यांनी२०२० मध्ये लग्नगाठ बांधली होती. या दोघांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले होते.