Audi Q7 :(Audi Q7) ऑडीने आपलय Q7 SUV या कारचे लिमिटेड एडिशन लॉन्च केले आहे. बाजारात ही कार अनेक जबरदस्त गाडयांना टक्कर देते. ही एक लक्सरी SUV कार आहे. जाणून घ्या या कारचे सर्व फीचर्स.

जर्मन ऑटोमेकर ऑडी (Audi)इंडियाने आपल्या SUV (SUV) कार ऑडी Q7 ची नवीन मर्यादित आवृत्ती(Limited Edition)देशात लॉन्च केली आहे. ही एक अतिशय आलिशान आणि लक्झरी एसयूव्ही आहे.

तसेच यामध्ये अतिशय पॉवरफुल इंजिन देखील वापरण्यात आले आहे. चला तर मग जाणून घेऊया ही कार खास का आहे.

काय आहे या कारची खासियत?

ऑडीने या SUV मध्ये पॉवरट्रेनसाठी 3.0L इंजिन दिले आहे, जे 335bhp पॉवर आणि 500Nm टॉर्क जनरेट करते. ही कार 0 ते 100 किमी प्रतितासचा वेग केवळ 5.9 सेकंदात मिळवते. ही SUV कमाल 250 किमी/तास वेगाने धावू शकते. या मर्यादित आवृत्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ऑडी यातील फक्त 50 युनिट्स तयार करेल.

ऑडी Q7 लुक

Q7 च्या लिमिटेशन एडिशनचा बाह्य भाग अतिशय खास पद्धतीने तयार करण्यात आला आहे. या आवृत्तीसाठी नवीन बॅरिक ब्राऊन रंग वापरण्यात आला आहे. यासोबतच त्याच्या फ्रंट लूकमध्ये नवीन ग्रिल आणि नवीन सिल ट्रिम जोडण्यात आली आहे. तर त्याची अष्टकोनी रूपरेषा पूर्वीसारखीच ठेवण्यात आली आहे.

ऑडी Q7 वैशिष्ट्ये

ऑडी Q7 SUV मध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या रांगेसाठी इलेक्ट्रिक अॅडजस्टमेंट, आठ एअरबॅग्ज, ओलुफसेन स्टिरिओ सिस्टम, 10.1-इंच टचस्क्रीन, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, पॅनोरॅमिक सनरूफ, एअर प्युरिफायर, 19-इंच अलॉय व्हील, मेमरी फंक्शन, 360-डिग्री यांसारखी पॉवर्ड वैशिष्ट्ये आहेत. कॅमेरा, अॅम्बियंट लाइटिंगच्या 30 शेड्स आणि लेन डिपार्चर वॉर्निंग सिस्टीमचा समावेश सीटसोबत करण्यात आला आहे.

ऑडीच्या नवीन Q7 SUV ची मर्यादित आवृत्ती किंमत 88.08 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. Mercedes-Benz GLS, BMW X7 आणि Volvo XC90 ही कार देशात आधीपासून बाजारात उपलब्ध आहेत.