मुंबई: ‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर सतत आपल्या लुक आणि फिटनेसमुळे चर्चेत असतात. या दोन्ही कलाकारांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडते. दोघांनी सैराटमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात दोघांची लव्हस्टोरी प्रेक्षकांना सर्वांना प्रचंड पसंत पडली होती. ही जोडी रिअल आयुष्यात ही एकमेकांना डेट करत आहे अश्या बातम्या कायम येत राहतात. या बतम्यांमवर रिंकू किंवा आकाश यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी त्यांचा एकमेकांसोबत घालवलेला वेळ या चर्चांना आणखी उधाण देतो.

दरम्यान, नुकतंच रिंकू आणि आकाशने एका पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती. या दोघांनी आपले काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये दोघेही फारच आनंदी दिसून येत आहेत. या फोटोमधील दोघांचा एकमेकांकडे पाहण्याच्या अंदाजाने दोघे एकमेकांच्या प्रेमात पडल्याचे युजर्स म्हणत आहेत.

तसेच, यावेळी रिंकूने पारंपरिक साडी नेसली आहे. तर आकाशने ब्लॅक टी शर्ट आणि ग्रीन पँट घातली आहे. दोघेंची जोडी फारच सुंदर दिसते आहे. फोटोमध्ये दोघेही एकेमकांसोबत मजामस्ती करताना दिसून येत आहेत. फोटो पाहून चाहते ‘आमची आवडती जोडी आर्ची आणि परश्या’ अशा कमेंट्स देत आहेत.