apple watch
apple watch

ॲपल वॉच (Apple Watch) मध्ये अनेक अप्रतिम फीचर्स देण्यात आले आहेत. या फीचर्समुळे लोकांचे प्राणही वाचले असून, याबाबत अनेक अहवाल समोर येत आहेत. असाच आता पुन्हा एकदा याबाबतचा नवा अहवाल समोर आला आहे. ॲपल वॉचच्या ईसीजी (ECG) फीचरमुळे हरियाणामध्ये राहणाऱ्या ३४ वर्षीय व्यक्तीचा जीव वाचला असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे.

12 मार्च रोजी नितेश चोप्राच्या (Nitesh Chopra) छातीत काही समस्या जाणवत होत्या. जेव्हा त्याने ऍपल वॉचमधून ईसीजीचे निरीक्षण केले असता, तेव्हा डिव्हाइसने त्यांना अलर्ट केले. त्यानंतर ते पत्नीसह तातडीने रुग्णालयात गेले. हॉस्पिटलमधील डॉक्टरांची रीडिंग ॲपल वॉचच्या रीडिंगसारखी (Apple Watch Reading) होती. त्यामुळे डॉक्टरांनी त्याच दिवशी इमर्जन्सी अँजिओग्राफी केली.

ज्यामध्ये असे आढळून आले की, चोप्राची मुख्य कोरोनरी धमनी पूर्णपणे ब्लॉक झाली होती. ज्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका (Heart attack) येऊ शकतो. अहवाल आल्यानंतर लगेचच डॉक्टरांनी याबाबत आवश्यक ती कारवाई केल्याने त्यांचे प्राण वाचले. नितेशने सांगितले की, या वयात हे घडू शकत नाही, असे वाटल्याने त्यांनी या रीडिंगकडे पूर्वी दुर्लक्ष केले होते.

परंतु सतत रीडिंगचे बीन्स मिळाल्यावर त्यांना समजले की, त्यांना हृदयाच्या आरोग्यासाठी ताबडतोब डॉक्टरांना भेटण्याची आवश्यकता आहे. याबाबत त्यांनी ॲपलचे सीईओ (Apple CEO) टिम कुक यांना पत्रही लिहिले आहे. पत्रात पत्नी नेहाने लिहिले आहे की, तुमच्या तंत्रज्ञानामुळेच आम्ही रुग्णालयात जाऊ शकलो. त्यामुळे माझे पती आता बरे आहेत. त्यामुळे तुमचे आभार मानते.

या पत्राला टीम कुक (Tim Cook) यांनी उत्तर दिले आहे. तुम्हाला योग्य वेळी वैद्यकीय उपचार मिळाल्याचे कळून मला आनंद झाला. तुमची कथा आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल धन्यवाद. ECG ॲप Apple Watch वर उपस्थित असलेल्या इलेक्ट्रिकल हार्ट सेन्सरचा वापर करून हृदयाचे ठोके रेकॉर्ड करते.