मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा नुकताच 57 वा वाढदिवस झाला. आमिरच्या वाढदिवसाच्या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, आमिर आता एका खास कारणामुळे चर्चेत आहे. आमिर खान लवकरच त्याची अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत पुन्हा पडद्यावर दिसणार असल्याचे सांगितले जात आहे.

आमिर खानने वाढदिवसानिमित्त प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपल्या नवीन प्रोजेक्टचा क्लुव्ह दिला. तो म्हणाला, “मी अजून माझ्या पुढच्या चित्रपटाची घोषणा केलेली नाही, तुम्हाला कसे कळले? प्लॅनिंग चालू आहे. लवकरच कळवतो.” असं आमिर यावेळी म्हणाला.

मिळालेल्या माहीतीनुसार, दिग्दर्शक आर. एस. प्रसन्ना आमिर आणि अनुष्काला त्याच्या पुढच्या चित्रपटात साइन करू शकतात. जे प्रसिद्ध स्पॅनिश चित्रपट ‘कॅम्पिओन्स’चे हिंदी रूपांतर आहे. आर. एस. प्रसन्ना यांनी यापूर्वी ‘शुभ मंगल झ्यादा सावधान’ यासारख्या लोकप्रिय हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. प्रसन्ना यांनी यासाठी अनुष्का शर्माशीही संपर्क साधला असल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. तसेच, हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट असणार आहे.

दरम्यान, आमिर खान लवकरच ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफही दिसणार आहे. दुसरीकडे अनुष्का शर्मा लवकरच ‘चकडा एक्सप्रेस’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू झुलन गोस्वामी हिच्या जीवनावर आधारित आहे.