MS Dhoni
MS Dhoni

चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) याने रविवारी पंजाब किंग्जविरुद्ध मैदानात उतरताच एक विशेष विक्रम आपल्या नावावर केला. महेंद्रसिंग धोनीच्या कारकिर्दीतील हा 350 वा टी-20 सामना आहे. हा विक्रम आपल्या नावावर करणारा महेंद्रसिंग धोनी दुसरा भारतीय आहे.

T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने (भारतीय खेळाडू) –

• रोहित शर्मा (Rohit Sharma) – 372
• एमएस धोनी- 350*
• सुरेश रैना- 336
• दिनेश कार्तिक – 329
• विराट कोहली (Virat Kohli) – 328

या 350 सामन्यांमध्ये 98 आंतरराष्ट्रीय सामने समाविष्ट आहेत, याशिवाय 222 सामने आयपीएल (IPL) चे आहेत. यासोबतच चॅम्पियन्स लीग आणि झारखंडमधील टी-20 सामन्यांचाही समावेश आहे.

आयपीएल सुरू होण्यापूर्वी कर्णधारपद सोडले –

महेंद्रसिंग धोनीने आयपीएल 2022 च्या आधी चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. आयपीएल सुरू होण्यापूर्वी धोनीने कर्णधारपद सोडले आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) कडे नेतृत्व सोपवले. चेन्नई सुपर किंग्जने या मोसमातील पहिले दोन सामने गमावले आहेत.

एमएस धोनी या आयपीएलमधील पहिल्या दोन सामन्यांमध्ये हिट ठरला आहे. पहिल्या सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले, तर दुसऱ्या सामन्यातही त्याने 6 चेंडूत 16 धावा केल्या. मात्र दोन्ही सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव झाला.

एमएस धोनीची गणना भारतातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते, तसेच तो आयपीएलमध्ये सुपरहिट कर्णधारही राहिला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने T20 विश्वचषक 2007, एकदिवसीय विश्वचषक 2011 आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 सारख्या आयसीसी स्पर्धा जिंकल्या. तर चेन्नई सुपर किंग्सनेही चार आयपीएल आणि दोन चॅम्पियन्स लीग जिंकले आहेत.