नवी दिल्ली : महिला विश्वचषक 2022 मध्ये, भारताला इंग्लंडकडून 4 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेतील भारताचा हा दुसरा पराभव आहे. इंग्लंडविरुद्ध भारतीय फलंदाजी फ्लॉप ठरली आणि संपूर्ण संघ 36.2 षटकांत 134 धावांत गारद झाला. स्मृती मानधना (35) आणि यष्टिरक्षक फलंदाज रिचा घोष (33) वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला इंग्लिश गोलंदाजीचा सामना करता आला नाही. प्रत्युत्तरात इंग्लंडने 32 व्या षटकात 6 गडी गमावून विजयाचे लक्ष्य गाठले.
इंग्लंडविरुद्ध झालेल्या पराभवानंतरही महिला विश्वचषक 2022 गुणतालिकेत भारतीय संघ अजूनही तिसऱ्या स्थानावर आहे. पण रन रेट घसरला आहे. आता भारताचा नेट रन रेट 0.632 आहे. भारताचे 4 सामन्यांत 4 विजय आणि 2 पराभवांसह 4 गुण आहेत. मात्र, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजचेही 4 सामन्यांनंतर 4-4 गुण न्यूझीलंडचा रन रेट (-0.257) आणि वेस्ट इंडिजचा (-1.233) आहे.
चांगल्या नेट रनरेटमुळे भारतीय संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजने त्यांचे पुढील सामने जिंकल्यास भारतीय संघाचे गुणतालिकेतील स्थान बदलेल.
न्यूझीलंडला आपला पुढचा सामना गुरुवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायचा आहे. त्याचबरोबर या शुक्रवारी वेस्ट इंडिजला बांगलादेशचा सामना करावा लागणार आहे. जर हे दोन्ही संघ या सामन्यांमध्ये जिंकले तर भारताची गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर घसरण होईल. भारताविरुद्धच्या विजयाचा फायदा गतविजेत्या इंग्लंडला मिळाला आहे. या सामन्यापूर्वी इंग्लिश संघ सलग तीन सामने हरला होता. मात्र भारताचा पराभव करून या संघाने विश्वचषकात विजयाने खाते सुरुवात केली असून आता गुणतालिकेत इंग्लंड बांगलादेशच्या मागे सहाव्या स्थानावर आला आहे. बांगलादेश 2 गुणांसह 7 व्या स्थानावर असून चारही सामने गमावल्यानंतर पाकिस्तान शेवटच्या स्थानावर आहे.
ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत खेळलेले चारही सामने जिंकले असून 8 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेनेही आतापर्यंत खेळलेले तीनही सामने जिंकले असून त्यांचे 6 गुण आहेत आणि ते दुसऱ्या स्थानावर आहे.