मुंबई : अंकिता लोखंडे ही अशी अभिनेत्री आहे जी दररोज लाइमलाइटमध्ये असते. पडद्यावरच्या कामाशिवाय ती वैयक्तिक कारणांमुळेही चर्चेत असते. दरम्यान, नुकतीच तिने कंगना राणौतच्या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी तिने एक खुलासा केला ज्यामुळे ती आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
अंकिता लोखंडे आपल्या वैवाहिक आयुष्यात खूप आनंदी आहे. तिचा पती विकी जैन देखील अंकितासोबत प्रत्येक प्रसंगात उभा दिसतो. प्रदीर्घ रिलेशनशिपनंतर दोघेही गेल्या वर्षी लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर अंकिता पती विकीसोबत सर्वत्र दिसू लागली. सध्या अभिनेत्री आणि तिचा पती विकी जैन टीव्ही शो ‘स्मार्ट जोडी’मध्ये दिसत आहेत आणि चाहत्यांनाही त्यांची जोडी खूप पसंतीस उतरली आहे. यादरम्यान, अंकिताने नुकतीच एक आनंदाची बातमी दिली आहे, जी ऐकून सगळेच थक्क होतील.
‘लॉक अप’ या शोमध्ये अंकिता लोखंडेने हजेरी लावली होती. कंगना रणौत आणि अंकिता लोखंडे यांचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत. मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसीमध्ये या अभिनेत्रींनी एकत्र स्क्रीन शेअर केली होती. अंकिता ‘पवित्र रिश्ता’ या वेब सीरिजच्या आगामी सीझनच्या प्रमोशनसाठी कंगनाच्या रिअॅलिटी शो लॉक अपमध्ये आली होती. या शोच्या नियमानुसार अंकिता लोखंडेनेही तिच्या आयुष्यातील एक गुपित उघड केले.
यावेळी अभिनेत्री म्हणाली, “बरं, विकीलाही हे माहीत नाही. मी गरोदर आहे. हे ऐकून स्पर्धक आणि कंगना आश्चर्यचकित झाले, पण नंतर अंकिता म्हणाली, ‘एप्रिल फूल बनवला आहे.’ अंकिता लोखंडेच्या या विधानावर अभिनेत्रीने म्हणते, ‘मला आशा आहे की तुझे खोटे रहस्य लवकरच खरे होईल.’ यावर अंकिताने उत्तर दिले, ‘लवकरच होईल, होईल…’
अंकिता प्रियकर विकी जैन याच्यासोबत 14 डिसेंबर 2021 रोजी विवाहबंधनात अडकली होती.