मुंबई : कोलकाता नाइट रायडर्सचा अनुभवी अष्टपैलू आंद्रे रसेलने IPL 2022 सुरू होण्यापूर्वी त्याच्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. त्याच्याबद्दल बरेच काही बोलले गेले आहे पण त्याला त्याच्या कामगिरीने सर्वांना उत्तर द्यायचे आहे.
आंद्रे रसेलने तीन दिवसांच्या विलगीकरणानंतर केकेआरच्या पहिल्या प्रशिक्षण सत्रात भाग घेतला. त्यानंतर त्याने ही प्रतिक्रिया दिली आहे. लिलावापूर्वी केकेआर संघाने रसेलला कायम ठेवले होते. मात्र, गेल्या मोसमात तो दुखापतीचा बळी ठरला. क्षेत्ररक्षण करताना त्याला दुखापत झाली होती पण आता तो फिट दिसत आहे. अशा परिस्थितीत आता आंद्रे रसेलला संघासाठी चांगली कामगिरी करायची आहे.
केकेआरच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आंद्रे रसेलने आगामी हंगामावर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “संघात पुनरागमन करताना मला खूप आनंद होत आहे. गेल्या काही हंगामात माझ्याबद्दल बरेच काही बोलले गेले पण मी यावेळी टीकाकारांना माझ्या खेळाने शांत करेन. मी बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग यात माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन. केकेआरने माझ्यावर विश्वास ठेवला असून संघाला विजय मिळवून देण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन.”
IPL 2022 चा पहिला सामना 26 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. आयपीएल 2021 च्या अंतिम सामन्यात दोन्ही संघ आमनेसामने होते, ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जने विजय मिळवला. कोलकाता नाईट रायडर्स 7व्यांदा आयपीएल मोसमाचा सलामीचा सामना खेळण्यासाठी सज्ज आहे.