मुंबई : बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री आणि अमिताभ यांच्या पत्नी जया बच्चन यांचा आज ७४ वा वाढदिवस आहे. आज जगभरातून जया यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर आज जया बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित आम्ही तुम्हाला अमिताभ यांनी भर अवाॅर्ड शोमध्ये जया यांना किस केलेला एक किस्सा सांगणार आहोत. चला हा किस्सा आपण पाहूया.
त्याचे झाले असे की, २४ जानेवारी २०१४ रोजी स्क्रीन अवाॅर्डसाठी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन आले होते. त्यावेळी अमिताभ बच्चन यांना पुरस्कार मिळाला होता. तो घेण्यासाठी स्टेजवर जाताना आधी आनंदानं त्यांनी जया बच्चन यांचा लिप किस केलं होतं. हा गोड क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि लगेच व्हायरल झाला होता. अमिताभ बच्चन यांच्या या कृतीचं अनेकांना आश्चर्यही वाटलं. त्या समारंभात अभिनेत्री रेखाही होत्या. त्यांनाही हे पाहून खूप आश्चर्य वाटलं होतं.
दरम्यान, हृषिकेश मुखर्जी यांनी ‘गुड्डी’ सिनेमात अमिताभ आणि जया यांना एकत्र घेतलं आणि तिथेच त्यांची प्रेमकथा सुरू झाली. अमिताभ यांना परंपरा जपणारी, पण विचारानं तितकीच आधुनिक अशी पत्नी हवी होती. जया यांच्यात त्यांना हे गुण जाणवले होते. जया बच्चन यांचे सुंदर डोळे त्यांना आवडायचे आणि या जोडप्याने लग्न केले.