गेले काही दिवसापासून मराठवाड्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न चांगलाच पेटला आहेत. शिवाय ऊस हंगाम हा अंतिम टप्प्यात आला असून ऊस मात्र शेतातच असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

लातूर जिल्ह्यामध्ये ऊसाचे क्षेत्र वाढलेले आहे.तर मांजरा नदीलगतच्या भागात ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. जिल्ह्यात 12 साखर कारखाने असूनही अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा मार्गी लागलेला नाही.

जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून इतर भागातील राजकीय हित साधून ऊसाची तोड केली जात आहे. आणि जिल्ह्यातील शेतकरी वाऱ्यावर असल्याचा आरोप आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला होता.

ऊस तोडी बाबत कारखान्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही ऊसाची तोड होत नसल्याने शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

त्यात लातुर जिल्हाचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा अतिरिक्त ऊसाचे गाळप झाल्याशिवाय जिल्ह्यातील साखर कारखान्यांची धुराडी ही बंद होणार नसल्याचे आश्वासन दिली आहे.

तरीही अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा मार्गी लागलेला नाही. ऊसाची लागवड झाल्यापासून 12 महिन्यांमध्ये ऊसाची तोड होणे आवश्यक आसते. पण यापेक्षा अधिकचा काळ गेला तर उत्पादनात आणि वजनामध्येही घट होते. परिणामी ऊसाची सद्यस्थिती पाहता परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.