मुंबई : ‘पुष्पा’ फेम अभिनेता अल्लू अर्जुनचा आज वाढदिवस आहे. आज अल्लूअर्जन ४० वर्षाचा झाला आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी आज तो युरोपला रवाना झाला आहे. यावेळी अल्लूअर्जनला विमानतळावर स्पॉट करण्यात आले आहे. याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अल्लूअर्जनने काळ्या रंगाचा लूक केलेला दिसत आहे. या लूकमध्ये तो खूपच स्टायलिश दिसत आहे. त्याने को-ऑर्डर सेट, स्वेटशर्ट घातले आहे. मात्र, यावेळी अल्लू अर्जुनसोबत त्याचे कुटुंब दिसले नाही. कॅमेऱ्यात तो विमानतळावर एकटाच क्लिक झाला होता. म्हणून अल्लूअर्जन नक्की वाढदिवस साजरा करण्यासाठी गेला आहे का? त्याचे कोणते काम आहे? याबद्दल चाहत्यांकडून प्रश्न विचारले जात आहेत.

दरम्यान, कामाबद्दल बोलायचे झाले तर, अल्लू अर्जुनने 2003 मध्ये ‘गंगोत्री’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते ज्यामध्ये त्याच्या अभिनयाला खूप पसंती मिळाली होती. या चित्रपटासाठी त्यांला नंदी स्पेशल ज्युरी अवॉर्डही मिळाला होता, त्यानंतर त्यांने मागे वळून पाहिले नाही आणि साऊथ चित्रपटसृष्टीत एकापेक्षा एक चित्रपट दिले. तसेच, नुकत्याच आलेल्या ‘पुष्पा’ या चित्रपटाने अल्लूअर्जनची ओळख जगभरात पसरवली.