मुंबई : मराठमोळी अभिनेता संदीप पाठक आपल्या बेधडक स्वभावासाठी ओळखला जातो. दरम्यान, नुकतच संदीप पाठकनं महाराष्ट्रातील राजकारण आणि राजकीय नेते यांच्याबाबत एक ट्विट केले आहे. जे सध्या खूप चर्चेत आले आहे.
संदीप पाठकनं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, ‘सर्व राजकीय नेते आपआपसात भांडत आहेत. परंतु एकही पक्ष किंवा एकही नेता सामान्य जनतेच्या समस्येबद्दल एक चकार शब्द बोलत नाही. महागाई, वीजटंचाई, पाणी समस्या…’ संदीप पाठकचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर बरंच व्हायरल झालेलं पाहायला मिळत आहे.
सध्या महाराष्ट्रात महागाईचा मुद्दा चर्चेत आहे. याच मुद्द्यावरून महाराष्ट्रील राजकीय नेते एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करताना दिसत आहेत. मात्र, याचदरम्यान आता अभिनेता संदीप पाठकचं ट्वीट सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत आहे. अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. तर अनेकांना संदीपला पाठिंबा दर्शवला आहे.