मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा काल लग्न सोहळा पार पडला आहे. या जोडप्याने पंजाबी रितीरिवाजांनुसार एकमेकांसोबत लग्न केले आहे. यात आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या कपलचे फक्त पंजाबीच नाही तर बंगाली रितीरिवाजांनीही लग्न केले आहे. याचे फोटो सध्या जोरदार व्हायरल होत आहेत.

व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये दिसते की, आलिया भट्ट आणि रणबीर बंगाली वर वधूसारखे नटले आहेत. यात दोघांचे बंगाली रितिरिवाजांनुसार लग्न होत आहे. हे फोटो खूप व्हायरल झाले असून, सध्या या बंगाली लग्नाची चर्चा जोरदार होत आहे.

पण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, दोन्ही स्टार्सच्या चाहत्यांनी त्यांच्या नावाने प्रत्येकी एक बाहुली बनवून त्यांचे बंगालीमध्ये लग्न लावून दिले आहे. ज्यामध्ये दोन्ही स्टार्सच्या बाहुल्या आणि बाहुल्यांवर त्यांचे चित्र लावण्यात आले होते. या लग्नाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये दोन्ही स्टार्सच्या बाहुल्या आणि बाहुल्या खूपच क्यूट दिसत आहेत.