मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. चित्रपटावर प्रेक्षकांकडून कौतुकांचा वर्षाव होत आहे. पण याचदरम्यान आलिया भट्ट आणि एसएस राजमौलीशी संबंधित एक वाद समोर आला होता. ज्यामुळे RRR चित्रपट सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत पहायला मिळत आहे.

आलिया भट्टने एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर, राम चरण आणि अजय देवगणसोबत आलियाने साऊथ फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवले आहे. पण काही दिवसांपूर्वी आलियाच्या तिच्या इन्स्टाग्रामवरून RRR संबंधित सर्व पोस्ट डिलीट केल्यामुळे राजमौली आणि आलियात भांडण झाल्याचे म्हंटले जात होते. या चर्चा सर्वत्र होत असतानाच आता या प्रकरणात आलिया भट्टने तिची प्रतिक्रिया दिली आहे.

आलियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यावर तीने एक लांब नोट लिहिली. त्यात तिने म्हंटले की ‘आजच माझ्या कानावर पडले की मी माझी RRR पोस्ट स्पष्टपणे हटवली आहे कारण मी RRR च्या टीमवर नाराज आहे. मी सर्वांना विनंती करते की त्यांनी इन्स्टाग्राम ग्रिडवर त्यांच्या विचारसरणीच्या आधारे गृहीतके बांधू नयेत, मी माझ्या इंस्टाग्राम ग्रिडवरून माझ्या जुन्या पोस्ट नेहमी हटवते.’

‘मला माझे खाते कमी गोंधळलेले आवडते. मला RRR चित्रपटाचा भाग बनण्याची संधी मिळाली याबद्दल मी सदैव कृतज्ञ आहे. मला सीतेची भूमिका करायला आवडली, मला एसएस राजामौली यांच्या दिग्दर्शनात काम करायला आवडले, मला तारक आणि चरणसोबत काम करायला आवडले, मला या चित्रपटातील माझ्या अनुभवाची प्रत्येक गोष्ट आवडली.’ असं आलिया म्हणाली.