alia
Alia Bhatt's first reaction to the news of marriage, said ...

मुंबई : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या चर्चा सध्या जोरात सुरू आहेत. जेव्हापासून त्यांच्या लग्नाची बातमी समोर आली आहे, तेव्हापासून त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत. आलिया-रणबीरचे चाहते त्यांच्या लग्नाशी संबंधित प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी आतुर आहेत. पण, दुसरीकडे रणबीर-आलिया किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी अद्याप हे दोघेही कोणत्या तारखेला लग्नबंधनात अडकणार आहेत याची पुष्टी केलेली नाही. मात्र, आता लग्नाच्या बातमीवर आलिया भट्टची प्रतिक्रिया समोर आली आहे. लग्नाच्या बातमीवर आलियाने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

YouTuber निकुंज लोटियाने रणबीर-आलियाच्या लग्नाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा मजेशीर व्हिडिओ पाहून आलियाही स्वतः प्रतिक्रिया देण्यापासून रोखू शकली नाही. हा व्हिडिओ शाहिद कपूर आणि कियारा अडवाणीच्या ‘कबीर सिंग’चा आहे, ज्यातील प्रसिद्ध दृश्याचा वापर करून निकुंजने आलिया-रणबीरच्या लग्नाशी जोडले आहे.

व्हिडिओमध्ये निकुंज लोटिया पांढरा कुर्ता परिधान करून पांढऱ्या कारच्या मागे धावत आहे. कारच्या मागे बॅनरवर लिहिले आहे. ‘आलिया वेड्स रणबीर’. इतकंच नाही तर व्हिडिओमध्ये आलिया-रणबीरच्या एका फोटोमध्ये निकुंजने स्वतःला रणबीरसोबत रिप्लेस केलं आहे. व्हिडिओ इतका मजेशीर आहे की इतर यूजर्सच नाही तर आलियाही प्रतिक्रिया देण्यापासून स्वतःला रोखू शकली नाही.

व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना आलिया भट्ट लिहिते, ‘Dead’ यासोबतच आलिया भट्टने हसणारा इमोजीही तयार केला आहे. आता आलियाची कमेंट पाहून असा अंदाज लावला जात आहे की आलियाने तिच्या लग्नाच्या बातमीवर कुठेतरी शिक्कामोर्तब केला आहे.

आतापर्यंत या स्टार जोडप्याच्या लग्नाच्या तारखेवर शिक्कामोर्तब झालेले नाही. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की दोघे 14 एप्रिलला लग्नबंधनात अडकणार आहेत. त्याचबरोबर काहींमध्ये असे बोलले जात आहे की, आलिया-रणबीर 17 एप्रिलला लग्न करणार आहेत.