Alia Bhatt : (Alia Bhatt) ब्रह्मास्त्राच्या प्रचंड यशानंतर आलिया भट्टने नुकताच आपल्या हॉलीवूड मुव्हीचा टीजर शेअर केला आहे. हार्ट ऑफ स्टोन या सिनेमाद्वारे आलिया हॉलीवूडमध्ये (Hollywood) पदार्पण करणार आहे. तिच्या या कामगिरीसाठी तिचे प्रचंड कौतुक केले जात आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हॉलिवूडमध्ये (Hollywood) धमाका करणार आहे. आलियाच्या हॉलिवूड पदार्पणाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आलिया गैल गडोतसोबत (Gal Gadot)हार्ट ऑफ स्टोन या चित्रपटात दिसणार आहे.

हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून सर्व सेलिब्रिटींचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये सर्व पात्र जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहेत.

आलिया भट्टने तिच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. नेटफ्लिक्सच्या टुडुम या ग्लोबल इव्हेंटमध्ये हा फर्स्ट लुक शेअर करण्यात आला आहे.

 

आलिया भट्टने व्हिडिओ शेअर केला आहे

फर्स्ट लूक शेअर करताना आलिया भट्टने (Alia Bhatt) लिहिले- ‘हार्ट ऑफ स्टोन आणि केयाचा फर्स्ट लूक. 2023 मध्ये Netflix वर येत आहे. आलियाची ही पोस्ट पाहून चाहते आणि सेलिब्रिटी तिच्या पोस्टवर भरपूर कमेंट करत आहेत. आलियाची आई सोनी राजदानने कमेंट केली – शानदार! हे खूप रोमांचक दिसते. त्याचवेळी अर्जुन कपूरने लिहिले – हे खूप मोठे आहे. अभीमान.

आलियाने गरोदरपणात अनेक अॅक्शन सीन शूट केले आहेत. काही काळापूर्वी आलियाचे सेटवरून शूटिंगचे फोटो समोर आले होते. ज्यामध्ये तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. या चित्रपटाबद्दल दिलेल्या मुलाखतीत आलिया म्हणाली – हा माझा पहिला हॉलीवूड चित्रपट आहे आणि त्यासाठी मला खूप मेहनत करावी लागली कारण मी पहिल्यांदाच एका अॅक्शन चित्रपटाचे शूटिंग करत होते.

हार्ट ऑफ स्टोनबद्दल बोलायचे तर हा चित्रपट टॉप हार्परने दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात आलिया आणि गॅलसोबत सोफी ओकेनाडो, पॉल रेडी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.