Ali Fazal And Richa Chadha : बॉलीवूडचे फेमस कपल अली फझल (Ali Fazal) आणि रिचा चड्ढा लवकरच विवाहबंधन (Wedding) अडकणार आहेत. मात्र यांचे लग्न 6 ऑक्टोबरला नाही तर 4 ऑक्टोबरला होणार आहे.

बॉलीवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेले हॉट कपल रिचा चढ्ढा (Richa Chadha) आणि अली फजल यावर्षी लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांनी त्यांच्या लग्नाची अधिकृत तारीख जाहीर केली आहे. 9 वर्षांहून अधिक काळ एकमेकांना डेट केल्यानंतर अली आणि रिचा अखेर पती पत्नी बनतील.

फिल्मफेअरच्या रिपोर्टनुसार, गुड्डू भैया पुढील महिन्यात 4 ऑक्टोबर 2022 रोजी लग्न करणार आहेत. याआधी असे वृत्त होते की हे जोडपे 6 ऑक्टोबर रोजी लग्न करू शकतात, परंतु आता लग्नाच्या तारखेबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. ही बातमी समोर आल्यानंतर बी-टाऊनमध्ये खळबळ उडाली आहे.

‘फुक्रे’ अभिनेत्री रिचा चढ्ढा (Richa Chadha) हिने अनेकदा मीडियासमोर तिच्या लग्नाबद्दल उघडपणे बोलले होते. अभिनेता अली फजल आणि त्याच्या नात्याबद्दल तिने कधीही काहीही लपवले नाही. ऋचाने सांगितले होते की, कोरोना महामारीच्या वेळी त्यांचे लग्न 2020 मध्ये पुढे ढकलण्यात आले होते, अन्यथा दोघेही लग्न करून सेटल झाले असते.

मात्र, आता दोघेही ऑक्टोबरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. वृत्तांवर विश्वास ठेवला तर अली आणि रिचा एका ग्रँड फंक्शनमध्ये लग्न करणार आहेत. या लग्न समारंभात बॉलिवूडचे बडे स्टार्स उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अलीकडेच, या जोडप्याने फेमिना मासिकासाठी प्री-वेडिंग फोटोशूट केले.

या जोडप्याच्या नात्याबद्दल बोलायचे झाले तर रिचा चढ्ढा आणि अली फजल (अली फजल रिचा चढ्ढा डेटिंग) 2013 पासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांची प्रेमकहाणी फुकरे चित्रपटाच्या शूटिंगपासून सुरू झाली. दोघांच्या नात्याला जवळपास 9 वर्षे झाली आहेत.

रिचाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, ती 2020 पासूनच लग्न करण्याचा प्रयत्न करत आहे, पण तसे होत नाही. कधी कोरोनामुळे तर कधी इतर कारणांमुळे आमचे लग्न पुढे ढकलले जात आहे. पण आम्‍ही दोघंही 2022 साली नक्कीच लग्न करणार आहोत.

रिचा आणि अली दोघेही फुक्रे 3 मध्ये एकत्र दिसणार आहेत. दरम्यान, हे प्रेमी युगल त्यांचे रोमँटिक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. दोघांमध्ये जबरदस्त केमिस्ट्री आहे.

View this post on Instagram

A post shared by Richa Chadha (@therichachadha)

अली फझलला त्याचे चाहते गुड्डू भैया या नावाने ओळखतात, अमेझॉन प्राइम वेब सिरीज मिर्झापूरचे त्याचे पात्र लोकांच्या खूप पसंतीस पडले. या मालिकेचा सीझन 3 लवकरच येत आहे.