rohit sharma
Alarm bells for competitors! Hitman appears in form in net session

मुंबई : 26 मार्चपासून आयपीएलचा 15 वा सीझन सुरू होत आहे. पण, मुंबई इंडियन्स 27 मार्चला त्यांचा पहिला सामना खेळणार आहे. त्यांचा हा सामना ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. आगामी हंगाम सुरू होण्याच्या अगोदर, मुंबईसाठी चांगली बातमी अशी आहे की कर्णधार रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे जो प्रतिस्पर्ध्यांसाठी धोक्याची घंटा आहे.

मुंबई इंडियन्सने 23 मार्च रोजी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये हिटमॅन सराव सत्रादरम्यान चौकार आणि षटकार मारताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये हिटमॅनच्या बॅटमधून एकापेक्षा जास्त शॉट्स पाहायला मिळत आहेत. रोहितचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांना खूप आवडला आहे.

दुसरीकडे, यावेळच्या मुंबईच्या प्लेइंग कॉम्बिनेशनबद्दल बोलायचे झाल्यास, संघातील अनेक जुने खेळाडू इतर संघात गेले आहेत आणि यावेळी रोहितला एक प्रकारे नवीन संघासोबत जावे लागणार आहे. सूर्यकुमार यादव दिल्लीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही, त्यामुळे त्याची जागा कोण घेणार हाही मोठा प्रश्न असेल.

शिवाय, रोहित शर्मासह किरॉन पोलार्ड आणि जसप्रीत बुमराह हे त्रिकूट तरुणांना सोबत घेऊ इच्छित आहे जेणेकरून त्यांच्या संघाला स्पर्धेत लवकरात लवकर गती मिळू शकेल. अशा परिस्थितीत रोहित शर्मा नव्या संघासोबत पुन्हा एकदा आयपीएल ट्रॉफी जिंकू शकतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.