मुंबई : अक्षय कुमार-क्रिती सेनॉन यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘बच्चन पांडे’ होळीच्या मुहूर्तावर शुक्रवारी (18 मार्च, 2022) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटातील अक्षयच्या गँगस्टर अवतार आणि स्वॅगचे चाहते कौतुक करत असतानाच सोशल मीडियावर या चित्रपटाला विरोध होत आहे. यातच, बच्चन पांडेच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे विवेक अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाइल्स’, जो बॉक्स ऑफिसवर सातत्याने विक्रम करत आहे. असे असूनही अक्षय कुमारच्या चित्रपटाची सुरुवात चांगली झाली आहे.
‘बच्चन पांडेने’ ‘द काश्मीर फाईल्स’ सोबत स्पर्धेचा सामना करूनही देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. सुरुवातीच्या अंदाजानुसार, पहिल्या दिवशी एकूण कलेक्शन 12 ते 15 कोटी रुपयांच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे. जे अपेक्षेपेक्षा खूप चांगले आहे. Box OfficeIndia.com च्या अहवालानुसार, हा चित्रपट देशभरात 2900-3000 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये त्याची सुरुवात चांगली झाली आणि जवळपास सर्व शो हाऊसफुल्ल झाले.
बच्चन पांडे चित्रपटावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत, प्रेक्षक याला अक्षय कुमारच्या इतर मसाला चित्रपटांसारखेच म्हणत आहेत. तर, प्रेक्षकांना या चित्रपटातिल डायलॉग आवडले आहेत, ज्यामुळे चित्रपटाला 2 दिवसात चांगले अंक मिळण्यास मदत होईल. चित्रपटाचा पहिला आठवडा चांगला असण्याची शक्यता असली तरी त्याला काश्मीर फाइल्सकडूनही तगड्या स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे.