Maharashtralive24.com
Maharashtra Breaking News Updates

Airtel Prepaid Plan under 500 : Airtel चे जबरदस्त आहेत ‘हे’ स्वस्तातले 3 प्लॅन, 15 पेक्षा जास्त OTT प्लॅटफॉर्म, अनलिमिटेड डेटा अगदी मोफत

या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला पूर्ण मनोरंजन मिळेल. कारण तुम्हाला 15 पेक्षा जास्त ओटीपी प्लॅटफॉर्मवर फ्री अॅक्सेस या मध्ये मिळत आहे. याशिवाय यात तुम्हाला जास्त वैधता आणि डेटाही मिळतो. या प्लॅन्सबद्दल जाणून घेऊयात

0

Airtel Prepaid Plan under 500 : टेलिकॉम कंपन्या आपल्या युजर्सना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्लॅन ऑफर करतात. जर तुम्ही चांगल्या प्लॅनच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला एअरटेलच्या तीन प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत ज्याची किंमत 500 रुपयांपेक्षा कमी आहे.

या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला पूर्ण मनोरंजन मिळेल. कारण तुम्हाला 15 पेक्षा जास्त ओटीपी प्लॅटफॉर्मवर फ्री अॅक्सेस या मध्ये मिळत आहे. याशिवाय यात तुम्हाला जास्त वैधता आणि डेटाही मिळतो. या प्लॅन्सबद्दल जाणून घेऊयात –

Airtel 359 Recharge Plan

एअरटेलच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. दररोज 100 एसएमएस मिळतात पण याची व्हॅलिडिटी 1 महिन्यापर्यंत असते. यासोबत तुम्हाला दररोज 2 जीबी डेटा मिळतो.

याशिवाय अपोलो 24|7, हॅलोट्यून्स आणि एअरटेल एक्सट्रीम प्ले असे अनेक बेनिफिट्स मिळतात. यात 15 हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्मचा फ्री एक्सेस देखील दिला जातो.

Airtel 399 Prepaid Recharge Plan

एअरटेलच्या 399 रुपयांच्या प्लानमध्ये दररोज 3GB डेटा मिळतो. याची वैधता 28 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि रोज 100 एसएमएस मिळतात.

यासोबतच एअरटेल युजर्संना अनलिमिटेड 5G डेटा आणि एअरटेल एक्सट्रीम प्ले देखील देत आहे. या प्लानमध्ये तुम्हाला 15 पेक्षा जास्त ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा फ्री एक्सेस मिळतो.

Airtel 499 Recharge Plan

या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 75GB डेटा मिळतो. तसेच दररोज 100 एसएमएस आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग ची सेवा देखील मिळते. या प्लानमध्ये 28 दिवसांची वैधता मिळत आहे.

या प्लानमध्ये तुम्हाला 3 महिन्यांसाठी डिस्ने + हॉटस्टारचा फ्री एक्सेस मिळतो. यात एअरटेल एक्सट्रीम प्ले चा फ्री एक्सेस आणि 15 हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्मवर फ्री एक्सेस मिळतो. मात्र, हे केवळ 6 महिन्यांसाठी मिळतो.