Airtel Xstream
Airtel Xstream

एअरटेल (Airtel) ने आपल्या स्ट्रीमिंग सेवेची म्हणजेच एअरटेल एक्सस्ट्रीम (Airtel Extreme) बॉक्सची किंमत कमी केली आहे. कंपनीने Airtel Xstream बॉक्सची किंमत 499 रुपयांनी कमी करून 2 हजार रुपये केली आहे. एअरटेलचा हा एक्सस्ट्रीम बॉक्स नवीन काळातील डीटीएच टेलिव्हिजन बॉक्स असेल, जो कोणत्याही टीव्हीला स्मार्ट टीव्हीमध्ये रूपांतरित करू शकतो.

लक्षात ठेवा की, नवीन किमती त्या ग्राहकांसाठी आहेत ज्यांना Xstream Box सह नवीन Airtel Digital TV कनेक्शन मिळत आहे. आता कंपनी अमोझोन प्राईम विडेओ (Amazon Prime Video), Disney + Hotstar आणि इतर OTT सेवा डायरेक्ट टू होम डेट-टॉप बॉक्ससह ऑफर करत आहे.

OTT प्लॅटफॉर्मची सदस्यता मिळेल –
Airtel ने सप्टेंबर 2019 मध्ये Xstream Stick सोबत Xstream Box लाँच केले. त्यावेळी या उत्पादनांची किंमत 3,999 रुपये होती. आता एअरटेलच्या वेबसाईटवर एअरटेल एक्सस्ट्रीम बॉक्सची किंमत दोन हजार रुपयांपर्यंत खाली आली आहे.

कंपनीने याआधीही त्याची किंमत कमी केली होती आणि त्यानंतर हा डिवाइस (Device) 2,499 रुपयांना उपलब्ध झाला होता. कंपनीने केवळ त्याची किंमत कमी केली नाही तर आता अनेक OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शनही त्यावर उपलब्ध होणार आहे.

नवीन ग्राहकांना Disney+ Hotstar, Amazon Prime Video, Sony LIV, Eros Now, Hungama आणि इतर OTT प्लॅटफॉर्म बघायला मिळेल. हि किंमत फक्त नवीन कनेक्शन घेतलेल्या वापरकर्त्यांसाठी लागू होईल.

तसेच हि नवीन किंमत मर्यादित काळासाठी असू शकते. Airtel Xstream Box Android 9.0 Pie वर आधारित Android TV OS वर कार्य करते आणि Google Play Store द्वारे 5000 हून अधिक अँप्स आणि गेम (Games) मध्ये प्रवेश मिळवते.

काय असतील वैशिष्ट्ये?
हे डिव्हाइस अंगभूत क्रोमकास्ट (Chromecast) सह येते आणि Google सहाय्यक व्हॉइस शोध आणि रिमोट आणि गेम पॅड म्हणून स्मार्टफोन वापरण्याची क्षमता देखील देते. Airtel Xstream Box वापरण्यासाठी वाय-फाय आवश्यक आहे. त्याची स्ट्रीमिंग गुणवत्ता तुमच्या इंटरनेट कनेक्शनच्या गतीवर अवलंबून असते.