Airtel 5G : देशात नुकतेच 5G सेवा सुरू झाली आहे. यामुळेच जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एअरटेल आपली 5G सेवा मोफत प्रदान करणार आहे. जाणून घ्या कोणत्या शहरांना (City) याचा लाभ होणार आहे.

2023 पर्यंत सर्व मेट्रो शहरांमध्ये 5G सेवा असेल

एअरटेलने (Airtel) घोषणा केली आहे की 2023 पर्यंत भारतातील सर्व प्रमुख मेट्रो शहरांमध्ये त्यांची 5G सेवा सुरू करण्याची योजना आहे. जर कोणत्याही एअरटेल वापरकर्त्याला 5G नेटवर्कची उपलब्धता तपासायची असेल, तर तो कंपनीच्या Airtel Thanks अॅपवरून करू शकतो.

तुमच्याकडे 5G सक्षम स्मार्टफोन असल्यास, तुम्हाला अॅपद्वारे आपोआप सूचना मिळेल. कंपनीचे म्हणणे आहे की वापरकर्त्यांना 5G नेटवर्कमध्ये (Network) व्हॉईस कॉल गुणवत्ता आणि हाय-स्पीड इंटरनेटच्या बाबतीत 4G पेक्षा 20 ते 30 पट अधिक स्पीड मिळेल.

एअरटेल 5g plus चा इंटरनेट स्पीड

Ookla ने उघड केलेल्या अहवालानुसार, दिल्लीमध्ये Airtel 5G Plus चा डाउनलोड स्पीड 197.98 Mbps दिसला आहे आणि मुंबईत 5G Plus चा डाउनलोड स्पीड 271.07Mbps नोंदवला गेला आहे. 5G Plus चा डाउनलोड स्पीड वाराणसीमध्ये सर्वाधिक म्हणजे 516.57Mbps होता, तर कोलकात्यात हा स्पीड मध्यम म्हणजेच 33.83Mbps होता.

एअरटेल 5जी प्लस प्लॅनची ​​किंमत

दूरसंचार ऑपरेटरने माहिती दिली आहे की Airtel 5G Plus तुम्ही आधीपासून वापरत असलेल्या 4G सिमवर उपलब्ध असेल. हे देखील घोषित करण्यात आले आहे की रोलआउट पूर्ण होईपर्यंत Airtel वापरकर्ते त्यांच्या विद्यमान डेटा प्लॅनवर 5G सेवांचा लाभ घेऊ शकतात.

त्यामुळे 5G सेवेचा आनंद घेण्यासाठी कोणतेही अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत. हे सूचित करते की एअरटेल वापरकर्त्यांना भारतात 5G सेवा ऍक्सेस करण्यासाठी नवीन सिम खरेदी करण्याची आवश्यकता नाही.

Airtel 5G Plus या शहरांमध्ये उपलब्ध आहे

भारतात 5G नेटवर्क सादर केल्यामुळे, एअरटेलने आठ शहरांमधून त्यांच्या 5G सेवांचा रोलआउट सुरू केला आहे. 2023 पर्यंत सर्व प्रमुख भारतीय शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्याची कंपनीची योजना आहे आणि 2024 पर्यंत, Airtel 5G Plus सेवा भारतातील सर्व प्रदेश आणि जिल्ह्यांमध्ये उपलब्ध होईल. दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, सिलीगुडी, नागपूर आणि वाराणसी येथील एअरटेल वापरकर्ते Airtel 5G Plus सेवा वापरत आहेत.