Dedication ceremony : प्रवरा मेडिकल ट्रस्ट व प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वात मोठया आय.सी.यु. सेंटरच्या भूमीपुजन कोनशिलेचे अनावरण व व्हेंटिलेटरचा लोकार्पण आज इसकॅान गोवर्धन इकोव्हीलेजचे डायरेक्टर गौरंगदास प्रभू यांच्या हस्ते झाले.

प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठात लोणी येथे झालेल्या या कार्यक्रमाला कुलपती डॉ राजेंद्र विखे पाटील , गुगल इंडियाचे हेल्थ केअर विभाग प्रमुख, गुलजार आझाद, ट्रान्सट्रेडिया युनिर्व्हसिटी चे चेअरमन उदीत शेठ , गोवर्धन इकोव्हिलेज चे सोशल इनिशिटिव्ह प्रमुख यचनित पुष्कर्णा, राज्यपालांचे विशेष कार्यकारी अधिकारी, राकेश नैथानी , कुलगुरु डॉ. व्ही. एन. मगरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना गौरंगदास प्रभू यांनी शांती, समुध्दी आणि सुखाची गुरुकिल्ली ही गीतेत आहे आज जग मानसीक विकांरानी ग्रासलेले आहे, त्यामुळे आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे हे टाळायचे असेल तर गीतेतील संस्कार आपल्याला मानसिक ताण तणावातुन मुक्तता देऊ शकतात.

पुढे बोलतांना त्यांनी भारत एक सुपर पॅावर देश होण्यासाठी प्रवरा मॅाडेल एक आदर्श उदाहरण असुन गेल्या पन्नास वर्षा पासुन विखे पाटील कुटुंबीयाकडुन ग्रामीण भागातील गोरगरीबांचे शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात प्रभावशाली कार्य सुरु आहे.

प्रवरा परिवार समाज्यातील शेवटच्या व्यक्ती पर्यंत आरोग्य सेवा पोहचत असल्यातचे मोठे समाधान असल्याचे त्यांनी व्यक्त केले.

यावेळी गुगुलचे हेल्थ केअरचे प्रमुख गुलजार आझाद बोलतांना म्हणाले की खेड्यातील एका शेतकरी कुटुंबातील व्यक्तींनी आपल्या दूरदृष्टीने आरोग्य सेवेचा संकल्प करीत हजारो डॉक्टर घडविले आहेत ही देशातील एक मोठी क्रांतीच आहे.

याच अनुषंगाने पुढे बोलतांना त्यांनी प्रवरा हा स्वतंत्र भारतातील सगळ्यात परिपुर्ण मॅाडेल असल्याचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संयोजन डॉ अमित मनी यांनी केल. तर सूत्रसंचालन डॉ दिपीका भालेराव यांनी केले तर डॉ रविद्र मनरीकर यांनी आभार मानले.

यावेळी माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील , महतं उध्दव महाराज मंडलीक, प्रवरा मेडीकल ट्रस्ट विश्वस्त सुर्वणाताई विखे पाटील , मोनिका सावंत, कल्याण आहेर पाटील , ध्रुव विखे पाटील, नंदकिशोर राठी, कैलास तांबे, डॉ प्रमोद म्हस्के उपस्थित होते.