मुंबई : काही दिवसांपूर्वी एका कार अपघातात अभिनेत्री मलायका अरोरा जखमी झाली होती. यानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी मलायकाची भेट घेत तिच्या तब्बेतीची विचारपूस केली. आता नुकतंच सलमानच्या घरातील एक खास व्यक्तीने मलायकाची भेट घेतली आहे. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून सलमान खानच्या बहीण अलविरा खान आहे.
मलायका अरोराची खास मैत्रीण अभिनेत्री करीना कपूर आणि सलमान खानची बहीण अलविरा खान अग्निहोत्रीने मलायकाची भेट घेतली आहे. अलविरा सोबत यावेळी तिची लेक अलिझेह अग्निहोत्री, मुलगा अयान अग्निहोत्री आणि आले होते.
अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका अरोरा सलमान खानच्या कुटुंबासोबत क्वचितच दिसून आली आहे. आता सलमानची बहीण अलविरा खान अग्निहोत्री हिने मलायका अरोराची भेट घेतल्याने दोघींमधे चांगले संबंध असल्याचं यावरून स्पष्ट होतंय.
दरम्यान, अपघाताच्या वेळी मलायका अरोरा तिच्या रेंज रोव्हर कारमध्ये होती, तेव्हा हे वाहन दोन कारमध्ये अडकले आणि त्यांची धडक झाली होती. अपघातानंतर मलायका अरोराला नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे तिचे सीटी स्कॅन करण्यात आले. या स्कॅनचा रिपोर्ट नॉर्मल आला असतानाही तिला रुग्णालयातच रात्रभर निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मलायकाला डिस्चार्ज देण्यात आला.