मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोव्हर सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. तो त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही. आता त्याचा असा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून सगळेच हैराण झाले आहेत. तो रस्त्याच्या कडेला एका गाडीवर चहा विकताना दिसतो आहे.
सुनील ग्रोव्हर इंस्टाग्राम अकाऊंटवर खूप सक्रिय असतो आणि अनेकदा त्याचे मजेदार व्हिडिओ शेअर करत असतो. आता त्याने त्याचा लेटेस्ट व्हिडिओ पोस्ट केला आहे, जो इंटरनेटवर खूप चर्चेत आहे. व्हिडिओमध्ये सुनील रस्त्याच्या कडेला एका गाडीवर चहा बनवताना दिसत आहे. यावेळी त्याची चहा बनवण्याची शैली चाहत्यांना खूप आवडली आहे. त्याच्या या व्हिडिओला खूप पसंती दिली जात आहे.
कॉमेडियन सुनील ग्रोव्हरच्या या व्हिडिओवर चाहते मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘म्हणूनच तुम्ही माझे आवडते आहात’. दुसऱ्याने लिहिले, ‘सर, मी तुमच्याइतका कोणाचाही मोठा चाहता नाही.’ ‘मी तुमची कॉमेडी खूप मिस होत आहे’ अशी कमेंट केली. त्याचवेळी दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, ‘Amazing you Sunil paaji.’ काही काळापूर्वी सुनील ग्रोवरवर हृदय शस्त्रक्रिया झाल्याची माहिती आहे. मात्र, आता तो बरा होऊन कामावर परतला आहे.
सुनील ग्रोव्हर सध्या ऋषिकेशमध्ये त्याच्या पुढच्या प्रोजेक्टचे शूटिंग करत आहे. अलीकडेच तो मुंबई विमानतळावर दिसला, जिथून तो ऋषिकेशला निघाला होता. सुनील ग्रोव्हर गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात सक्रिय आहे. तो ‘भारत’, ‘गब्बर इज बॅक’ आणि ‘बागी’सह अनेक सुपरहिट चित्रपटांचा भाग आहे. तो शेवटचा ‘सनफ्लॉवर’ या वेबसिरीजमध्ये दिसला होता.