मुंबई : ‘बिग बॉस 15’च्या घरात सतत भांडण करणाऱ्या दोन अभिनेत्री रश्मी देसाई आणि तेजस्वी प्रकाश पुन्हा एकदा एकत्र झळकत आहेत. अलीकडेच एकता कपूरच्या सुपरहिट ‘नागिन 6’मध्ये रश्मी देसाईची एण्ट्री झाली आहे. शो बदलला असला तरी मात्र या दोन अभिनेत्रींनमधले भांडण काय संपायचे नाव घेत नाहीये. ‘नागिन 6’मध्ये येताच रश्मी देसाई तेजस्वी प्रकाशसोबत भांडताना दिसली आहे.

अलीकडेच रश्मी देसाई आणि तेजस्वी प्रकाश यांच्यात सर्व काही ठीक नाही अशी बातमी आली होती. रश्मी देसाईला तेजस्वी प्रकाशपेक्षा जास्त फीस देण्यात आल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. हे जाणून तेजस्वी प्रकाश मेकर्सवर नाराज झाली आहे. या बातमीनंतर असा दावा करण्यात आला की, ‘बिग बॉस 15’ नंतर ‘नागिन 6’ मध्येही रश्मी देसाई आणि तेजस्वी प्रकाश यांची वैर सुरू झाली आहे. मात्र, रश्मी देसाईच्या नुकत्याच एका वक्तव्यामुळे या सर्व अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.

त्याचे झाले असे की, तेजस्वी प्रकाश आणि रश्मी देसाई ‘बिग बॉस 15’ च्या घरात जोरदार भांडताना दिसले. मात्र, ‘नागिन 6’च्या सेटवर असे काहीही झाले नाही. उलट दोघींमध्ये आता चांगली मैत्री झाली आहे. याचा खुलासा खुद्द रश्मी देसाईने केला आहे. एका मुलाखतीत ती म्हणाली, ‘मला बिग बॉसच्या घरात तेजस्वी प्रकाशला जाणून घेण्याची संधी मिळाली नाही. ‘नागिन 6’च्या सेटवर आम्ही दोघे मित्र झालो. काळाच्या ओघात आमची मैत्री अधिक घट्ट होत चालली आहे.’ असं म्हणत रश्मीने या वादाच्या अफवांवर पूर्ण विराम दिला आहे.