मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अभिनेता निक जोनस हे मागच्या वर्षी एका मुलीचे आई-बाबा झाले आहेत. बाळाला जन्म देऊन एवढे महिने झाले असले तरी प्रियांकाने अद्यापही तिच्या मुलीचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेला नाही. दरम्यान, नुकतच आता प्रियांकानं तिच्युअ मुलीविषयी एक मोठा निर्णय घेतला आहे.

मुलाविषयी मोठा निर्णय घेताना प्रियांका म्हणली की, ‘पहिलं मुल प्रत्येक आई-वडिलांसाठी स्पेशल असतं. कारण ते आपल्या आई-वडिलांना एक सन्मानाची पदवीच जणू बहाल करत असतं. प्रत्येक पालकाला पहिल्यांदा आई-बाबा झाल्यावर तशा सन्मानाच्या भावनाही मनात जागरुक होतातच. आई आणि बाबा होणं यापेक्षा जगात दुसरा कोणताच आनंद नाही किंवा यापेक्षा दुसरी कोणतीच पदवी ग्रेट नाही असं प्रत्येकाला त्याक्षणी वाटतं.’

‘पण त्यातनंच कधीकधी अपेक्षा आपल्या मुलावर किंवा मुलीवर त्यांच्या जन्मापासूनच नकळत लादल्या जातात. तसं आईवडिलांचं करणं चुकीचं असतं असं नाही पण त्यात आपलं मुल भरडलं जाऊ नये हा मुद्दा लक्षात घेणं देखील महत्त्वाचं असतं. म्हणूनच माझ्या अपेक्षा, माझी स्वप्न, एखादी गोष्ट करण्याविषयीची माझी भीती यापैकी कोणतीही गोष्ट मी मुलावर लादणार नाही’ अस म्हणत मुलाविषयी मोठा निर्णय प्रियंकाने घेतला आहे.

प्रियांका आणि निकने 22 जानेवारीला आपल्या मुलीच्या जन्माची घोषणा इंस्टाग्रामवर केली होती. दरम्यान, प्रियंका चोप्राची आई मधु चोप्रा देखील अद्याप तिच्या नातवाला भेटणार नसल्याचे वृत्त अलीकडेच आले होते.