मुंबई : अभिनेत्री सना खान गुजरातचे उद्योगपती मुफ्ती अनस सय्यद यांच्यासोबत लग्न करून बॉलिवूडपासून सद्या दूर झाली आहे. मात्र सना सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असते. ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील फोटो शेअर करत असते. नुकतंच सनाने एक फोटो शेअर केला आहे. ज्या फोटोंमध्ये ती जगातील सर्वात उंच रेस्टॉरंटमध्ये गोल्ड टी पिताना दिसतीये.

दुबईतील बुर्ज खलिफा येथील जगातील सर्वात उंच रेस्तराँ अ‍ॅटमॉस्फियर दुबई येथे सना खान सोन्याचा मुलामा असलेला चहाचा आस्वाद घेतला. सना खानने आपल्या सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाली, “आपल्या जीवनाची तुलना त्यांच्याशी कधीही करू नका जे चुकीच्या पद्धतीने कमावलेल्या गोष्टींचा आनंद घेतात. या जगात ते अधिक यशस्वी दिसतात. परंतु अल्लाहसमोर ते काहीच नाहीत आणि तेच महत्त्वाचे आहे.”

बुर्ज खलिफामधील अ‍ॅटमॉस्फियर हे जगातील सर्वाधिक उंचीवर असलेले रेस्तराँ असल्याचा दावा करते. इथला चहा आणि जेवण खूप महाग आहे. सनाने प्यायलेल्या गोल्ड प्लेटेड चहाची किंमत १६० दिरहम म्हणजेच सुमारे ३३०० रुपये आहे. या सोन्याच्या चहाची किंमत ऐकून नेटकरी चकित झाले आहेत.