मुंबई : मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरचे लाखो चाहते आहेत. या चाहत्यांसोबत संपर्कात राहण्यासाठी सई सोशल मीडियावर कायम वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. दरम्यान, सईने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. सईची ही पोस्ट पाहिल्यानंतर चर्चांना उधाण आले आहे.

सईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. यावेळी सईने तिचा नाही तर एका वेगळ्या व्यक्तीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत सई म्हणाली, “मी कशाप्रकारे तुला ब्लश करायला भाग पाडते नं..!” असे कॅप्शन तिने दिले आहे. यासोबतच सईने #one #saheb #daulatrao असे काही हॅशटॅग्ज वापरले आहेत. आता ही व्यक्ती कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अनेकांनी पोस्टवर कमेंट करत प्रश्नांचा पाऊस पाडला आहे.

तर या फोटोतील ही व्यक्ती आहे तरी कोण? हे आम्ही तुम्हाला सांगतो. ही व्यक्ती प्रसिद्ध निर्माता अनिश जोग आहे. अनिश जोग आणि सई ताम्हणकर यांनी अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. ‘गर्लफ्रेंड’, ‘धुरळा’, ‘YZ’, ‘टाइम प्लीज’ अशा अनेक चित्रपटांची निर्मिती अनिश जोग याने केली आहे.