poonam pandy

मुंबई : कंगना राणौतने होस्ट केलेला ‘लॉक अप’ हा शो ज्या दिवसापासून रिलीज झाला त्या दिवसापासून नवीन रेकॉर्ड बनवत आहे. शो सुरु होऊन 19 दिवस झाले आहेत आणि तो OTT प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक पाहिला जाणारा शो बनला आहे. वाद, प्रेम आणि सगळं काही या शोमध्ये दाखवलं जात आहे. पूनम पांडेही या शोमध्ये कैदी म्हणून कंगनाच्या तुरुंगात कैद आहे.

दरम्यान, पूनम खूप छान खेळ दाखवत आहे. नुकत्याच झालेल्या वीकेंडच्या एपिसोडमध्ये, जिथे कंगनाने कैद्यांवर हल्ला चढवला, तिथे पूनम पांडेचे प्रचंड कौतुक करण्यात आले.

कंगना रणौतने पूनम पांडेचे तिच्या खेळाच्या नियोजनाचे कौतुक केले. यादरम्यान, कंगनाला तिची एक कला इतकी आवडली की अभनेत्रीने पूनमला ते शिकवण्यास सांगितले. तसेच त्यासाठी तू क्लासेस घे असं देखील कंगना म्हणाली.

लॉकअपमध्ये एक टास्क दिला गेला होता, ज्यामध्ये पूनम पांडे तिच्या हॉटनेसने लोकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरली होती. कंगना राणौत म्हणाली, ‘तुझा अभिनय, तू साकारलेली भूमिका खरोखरच चर्चेत होती.’

कंगना राणौत पुढे म्हणाली की, “फूस लावणे ही एक कला आहे. आणि मी पूनम पांडेशी सहमत आहे. जी जुन्या काळात महिलांना शिकवली जात होती.” कंगना केलेल्या कौतुकानंतर पूनम लालबुंद झालेली दिसली.

यावेळी कंगना राणौतने पूनमला सल्ला देखील दिला, “अभिनेत्रीने तिला यासाठी क्लासेस घ्यायला सांगितले ज्यात फूस लावण्याची कला शिकवू शकेल. अभिनेत्री पुढे म्हणाली, तुझ्या या क्लासेसमध्ये आम्हीही प्रवेश घेऊ, आम्हालाही तुझ्याकडून प्रशिक्षण घ्यायला आवडेल.”

गेल्या आठवड्यात स्पर्धकांना एक टास्क देण्यात आला होता ज्यामध्ये पूनम पांडेला मोहक राजकुमारीची भूमिका देण्यात आली होती. या टास्कमध्ये पूनम पांडेशिवाय करणवीर बोहरा, मुनाव्वर फारुकी, शिवम शर्मा, सारा खान आणि अली मर्चंट यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या.