मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री काजोल सध्या चित्रपटापासून लांब असली तरी तिच्या चाहत्यांची संख्या काही कमी झालेली नाही. ती सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. नुकताच काजोलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काजोल आता तिसऱ्या बाळाची आई होणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

काजोलचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. अलीकडेच अपूर्व मेहताचा ५० वा वाढदिवस होता. तर त्याच्या बर्थडे पार्टीला काजोलने काळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे तर काहींनी काजोल प्रेग्नेंट आहे का असा प्रश्न केला आहे.

तर खरं काय? आम्ही तुम्हाला सांगतो. काजोल प्रेग्नंट नाही. ड्रेसमुळे तिचं सुटलेलं पोट दिसत होतं. ते पाहून सोशल मीडियावरील युझर्सनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. त्यामुळे काजोलचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिला बॉडीशेमिंगला सामोरे जावे लागत आहे.