मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) 26 मार्चपासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व संघांनीही तयारी जोरात सुरू केली आहे. त्याचबरोबर लीग सुरू होण्यापूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सच्या संघात एक खास व्यक्तीही सामील झाली आहे. फ्रेंचाइजीने या खास व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो चाहत्यांमध्ये चांगलाच व्हायरल होत आहे.
मुंबई इंडियन्सच्या अधिकृत ट्विटर हँडलने शेअर केलेल्या या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘आला रे आला’ असे लिहिले आहे. 2013 मध्ये आपला शेवटचा आयपीएल सामना खेळणारा सचिन तेंडुलकर मुंबई संघाशी एक मार्गदर्शक म्हणून संबंधित आहे. याच खेळाडूची मुंबई संघात आता एंट्री झाली आहे. मुंबई इंडियन्सला 27 मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे आणि त्याआधी सर्व खेळाडू नेटमध्ये घाम गाळत आहेत.
Aala Re! 👀#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians MI TV pic.twitter.com/BmQX5ADfWQ
— Mumbai Indians (@mipaltan) March 24, 2022
मुंबई इंडियन्स संघ
रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्य कुमार यादव, किरॉन पोलार्ड, इशान किशन देवाल्ड ब्रेविस, अनमोलप्रीत सिंग, वसिल थंपी, मुरुगन अश्विन, जयदेव उनाडकट, एन. टिळक वर्मा, जोफ्रा आर्चर, डॅनियल सॅम्स, टायमल मिल्स, टिम डेव्हिड, रमणदीप सिंग, आर्यन जुयाल, फॅबियन ऍलन, रिले मेरेडिथ, राहुल बुद्धी, हृतिक शोकीन, मोहम्मद अर्शद खान आणि अर्जुन तेंडुलकर.