Aadhaar Card : आधार कार्ड ही तुमची अधिकृत ओळख आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या आधार कार्डमध्ये दिलेला तुमचा फोटो वर्षानुवर्षे बदलला नसेल किंवा तुम्हाला तुमचा फोटो आवडला नसेल तर तो नव्या फोटोसह नक्कीच अपडेट करू शकता.

आधार कार्ड आज कोणत्याही भारतीयाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. कोणतेही सरकारी काम असो किंवा कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डची मागणी अनिवार्य कागदपत्रांमध्ये केली जाते.

यामध्ये कोणत्याही व्यक्तीचे नाव, फोटो, पत्ता, जन्मतारीख अशी महत्त्वाची माहिती नमूद केलेली असते. अशा परिस्थितीत आधार कार्ड तुमची अधिकृत ओळख म्हणून काम करते.

त्यामुळे जर तुम्ही तुमच्या आधार कार्डमध्ये दिलेला फोटो वर्षानुवर्षे बदलले नसेल किंवा तुम्हाला तुमचा फोटो आवडला नसेल तर तो कसा अपडेट करायचा याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोंत.

UIDAI द्वारे अपडेट…
UIDAI आधार कार्ड बनवते तसेच त्यात बदल करण्याची सुविधा देते. UIDAI च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आधार कार्डचे अनेक तपशील अपडेट करू शकता.

तुमचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर ईमेल आयडी आणि इतर अनेक मूलभूत माहिती बदलणे खूप सोपे आहे. अनेक वेळा माहितीअभावी लोक आधार कार्ड अपडेट करू शकत नाहीत. जर तुम्ही देखील त्यापैकी एक असाल तर आम्ही तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्याची संपूर्ण प्रक्रिया येथे सांगत आहोत.

आधार कार्डचा फोटो कसा बदलावा
आधार कार्डचा फोटो अपडेट करण्यासाठी तुम्हाला प्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यामध्ये तुम्हाला आधार नोंदणी अर्ज डाउनलोड करावा लागेल,

त्यानंतर या अर्जात दिलेली आवश्यक माहिती भरावी लागेल. हा अर्ज भरल्यानंतर, तुम्हाला आधार नोंदणी केंद्रावर जाऊन हा अर्ज सबमिट करावा लागेल. तुमचा नवीन फोटो आधार नोंदणी केंद्रावरच घेतला जाईल.

त्यानंतर तुम्हाला १०० रुपये शुल्क भरावे लागेल आणि त्यावर जीएसटी लागू होईल. फी भरल्यानंतर तुम्हाला पोचपावती मिळेल. त्यानंतर तुमचे आधार अपडेट होण्यासाठी ९० दिवस लागू शकतात.