मुंबई : सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाचा क्रेझ परदेशातही पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची चर्चा जोरात होत आहे. दरम्यान नुकतीच ‘पुष्पा 2’ संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे.
माहितीनुसार, अल्लू अर्जुन या वर्षी जुलै महिन्यात ‘पुष्पा: द रुल’ चित्रपटाची शूटिंग सुरू करणार आहे. सुकुमार दिग्दर्शित चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी अल्लू अर्जुन कुटुंबासोबत छोट्या सुट्टीवर जाणार आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलमध्ये अनेक महत्त्वपूर्ण दृश्ये शूट करण्याची योजना आखली आहे. चित्रपटाची टीम रात्रंदिवस काम करत आहे. रिपोर्ट्समध्ये असेही समोर आले आहे की जर चित्रपटाचे शूटिंग उन्हाळ्यात सुरू झाले तर याचा अर्थ निर्माते 2023 मध्ये चित्रपट प्रदर्शित करतील. ही माहिती समोर येताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर ‘पुष्पा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे 300 कोटींची कमाई केली. थिएटरमध्ये स्प्लॅश केल्यानंतर, निर्मात्यांनी OTT प्लॅटफॉर्मवरही चित्रपट प्रेक्षकांसाठी प्रदर्शित केला. याशिवाय चित्रपटाच्या शीर्षकाबद्दल बोलायचे झाले तर चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे नाव ‘पुष्पा : द रुल’ असे ठेवण्यात आले आहे.