7th Pay Commission : राज्य कर्मचाऱ्यांसंदर्भात (State Government Employee) एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी झाला आहे. राज्य कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर महिन्यातील वेतना संदर्भात एक महत्त्वाचा शासन निर्णय राज्य शासनाकडून निर्गमित करण्यात आला आहे. सदर शासन निर्णय राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागा अंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका / मदतनिस / मिनी अंगणवाडी सेविका यांच्या संदर्भात आहे.
या संबंधित राज्य कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर महिन्यातील वेतन संदर्भात 28 ऑक्टोबर 2022 रोजी एक सुधारित शासन निर्णय निर्गमित झाला आहे. या राज्य कर्मचाऱ्यांच्या अर्थसंकल्पीत केलेल्या वेतनाबाबत सदर शासन निर्णय जारी झाला आहे. अशा परिस्थितीत आज आपण राज्य शासनाकडून जारी झालेला सुधारित शासन निर्णय नेमका आहे तरी काय याबाबत सविस्तर पण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राज्य शासनाकडून जारी झालेला 28 ऑक्टोबर रोजी च्या शासन निर्णयानुसार राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांना ऑक्टोबर महिन्यातील वेतन अदा करण्यासंदर्भात महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत.
28 ऑक्टोबर रोजी जारी झालेला शासन निर्णय खालील प्रमाणे जशास तसा :-
1.आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांच्या अधिनस्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते. केंद्र शासनाकडून विहीत कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन अदा करणे शक्य व्हावे, याकरिता अपर मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २ जून, २०१७ रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
2.सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका, मदतनिस व मिनी अंगणवाडी सेविका यांचे माहे ऑक्टोबर, 2022 या महिन्याचे मानधन अदा करण्याकरिता एकुण रुपये १३३२३.२४ लाख एवढा निधी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
एकंदरीत या शासन निर्णयाच्या माध्यमातून १३३२३.२४ लाख एवढा निधी राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांना वितरित करण्याबाबत मान्यता देण्यात आली आहे.